औसा तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे मागणी
औसा / प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय अनुसूचित जातीतील हिंदु खाटीक कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीने अत्याचार केला आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ४,६ अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली असून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी औसा तहसीलदारांना एका
निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पिडीत कुटुंबात वयोवृध्द आजाराने ग्रस्त सासु, सासरे, एक विधवा महीला व त्यांच्या ४लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे, जी मोलमजुरी करून उदनिर्वाह भागविते. त्यामुळे आरोपी व आरोपीच्या
कुटूंबियाकडून पिडीत कुटूंबावर दबाव आणण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनास औसेकरांच्या वतीने मागण्या करण्यात येत आहे. पिढीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे. पिढीत कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी. पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा. सदरचे प्रकरण फास्ट ट्रैक न्यायालयात चालवावे व आरोपीस फाशी देण्यात यावी. पिडीत
कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी. जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अॅड दत्तात्रय बेंद्रे, दिपक कांबळे, श्रावण कांबळे, महावीर बनसोडे, विलास तपासे, सद्दाम पठाण, मौनोद्दीन शेख आदींनी हि मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.