ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व जाणून लावलेल्या सगळ्या झाडांना आळीपाळीने टॅंकरद्वारे पाणी देऊन ती झाडे जगविण्याचे कार्य केले जात आहे.
आज ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी बार्शी रस्त्यावरील जिल्हा परिषद कार्यालयापासून ते संविधान चौक ते एक नंबर चौक ते शहीद भगतसिंग चौक ते बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज ते रेल्वे उड्डाणपुल परिसरातील सर्व झाडांना नऊ टॅंकर द्वारे भरपूर पाणी पाजून आपले कार्य संपन्न केले. आजचा १७३५ व्या दिवसाचा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, मनिषा कोकणे, दयाराम सुडे, सिताराम कंजे, नागशेन कांबळे, प्रवीण भराटे, रवी तोंडारे, ओंकार सदरे, बालाजी उमरदंड, चाटे सर, बाळासाहेब बावणे, आकाश चिल्लरगे, सोमनाथ चिल्लरगे यांनी अथक परिश्रम घेतले.
यानिमित्ताने ग्रीन लातूर वृक्ष टीमने एक पत्रक काढून उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये प्रत्येक लातूरकरांनी आपल्या परिसरातील दोन-चार झाडे दत्तक घेऊन त्यां झाडांना पाणी देण्याचे कार्य करावे असे आव्हान ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी केले आहे. या आव्हानास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे असे पद्माकर बागल यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.