अजीम शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा."विद्यार्थी हे बालवैज्ञानिकच असतात." .प्रा.शेख एन आय.

अजीम शाळेत विज्ञान दिन उत्साहात साजरा.
"विद्यार्थी हे बालवैज्ञानिकच असतात."
            .प्रा.शेख एन आय.
शेख बी जी .

औसा. दिनांक २८ अजीम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात विज्ञान रांगोळी,विज्ञान चित्रप्रदर्शन,प्रयोगाचे विवीध माॅडेल, भाषण स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान दिनानिमीत्त विद्यार्थ्यांना संबोधीत करताना प्रा.शेख.एन.आय.प्राचार्य अजीम कनिष्ठ महाविद्यालय, औसा यांनी लहान पणातुनच विज्ञानाची परिभाषा आपन घरातुन व शाळेतुन शिकत असता असे विद्यार्थ्यांना सांगितले. २०२४ विज्ञान दिनाची थीम "सतत भविष्य के लिये विज्ञान " (science for sustainable future) या विषयाला धरुन आजचा विज्ञान दिन साजरा करण्यात आला त्यात शाळेतील पर्यवेक्षक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विवीध विज्ञान माॅडेल चे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या मांडले.
या कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणुन शेख एन.आय, प्रमुख पाहुणे म्हणुन पर्यवेक्षक केसरे भा.चं, डाॅ. सिद्दीकी के.एम.,शेख टी.एम. हे लाभले .सुत्रसंचलन पठाण समीर सर यांनी तर आभार सौ.सत्तारी जी.डी.यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विज्ञान विभागप्रमुख सौ.दुरुगकर एन.एम.,विज्ञान विषयाचे अध्यापन करणारे कोव्हाळे बी.व्ही.,माशाळकर एस एन,कोळपे जी.डी,पटेल आय.एच. सय्यद आसेफ सर, सौ.देशमुख आर.एस.,सौ.सय्यद ए.एम.,सौ.शेख जी.एच.,सौ.काझी सायमा मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या