*06 जिवंत काडतुस व गावठी कट्टयासह आरोपी अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


  *06 जिवंत काडतुस व गावठी कट्टयासह आरोपी अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


               लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात विशेष पथक नेमून कार्यवाही करण्यात येत होती. 
                पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 27/02/2024 रोजी लातूर बायपास चे रेल्वे स्टेशन चौकातून एका इसमास ताब्यात घेऊन एक गावठी कट्टा(पिस्टल) सह 06 जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे.
              स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर इसम नामे 

1) जितेंद्र तुकाराम जाधव, वय 51 वर्ष, राहणार चंद्रोदय कॉलनी, प्रकाश नगर, लातूर सध्या राहणार पिंटू हॉटेल जवळ, मळवटी रोड, लातूर
                 यास रेल्वे स्टेशन चौक येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि सहा जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.
              याप्रकरणी पोलिस अमलदार खुर्रम काझी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 147/2024 कलम 3 (1) 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.
            स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून गावठी कट्टा व सहा राउंड बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.
               सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर , दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या