शिक्षणातून मान तथा प्रसिद्धी मिळते-मौलाना मुहम्मद इसराईलसाहब रशीदी.*उद्योजक अलहाज हिमायत पटेल इब्राहिमसाब सरगुरु जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

*शिक्षणातून मान तथा प्रसिद्धी मिळते-मौलाना मुहम्मद इसराईलसाहब रशीदी.*
उद्योजक अलहाज हिमायत पटेल इब्राहिमसाब सरगुरु जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.


*औसा (प्रतिनिधी)-* येथील नबी नगर स्थित ऑबीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रागणांत शुक्रवार,२३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता मोठया उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजमुनेहा इकबाल यांनी प्रास्ताविक करुन संस्थेच्या तथा शाळेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.यावर्षी विविध विषयावरील माहितीपुरक संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या समोरील प्रांगणात सादर करण्यात आले.शिक्षण,सामाजिक ध्येय,साक्षरता,वैज्ञानिक दृष्टिकोन, संस्कृती,जबाबदारी,बालकामगार,निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
        यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जमियत उल्मा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना मुहम्मद इसराईल साहब रशीदी,काँगेसचे सरचिटणीस अमरभैय्या खानापुरे,आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख,माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकीलभाई,इमाम हाफीज फिरोजसाब इशाअती,युवा उद्योजक इंजि.इम्रान सय्यद,संस्था अध्यक्ष अलहाज शेख आर.एम.गुरुजी,सुलतान बागवान, अखलाक सिद्दीकी,सय्यद हमीद, चांदभाई सिद्दीकी,एमआयएम ज्येष्ठ नेते मुजफ्फरअली इनामदार,मुद्दसीर काझी,ऍड.फेरोजखान पठाण,दलमीर पटेल,अलहाज हिमायत पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व कुंडीरोपटे देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर मौलाना मुहम्मद इसराईल साहब रशीदी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,एवढया लहान वयात एवढं चांगलं कलाविष्कार हया लहान लेकरांनी केलं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.ह्या मुलांची कृती पाहून मला समजले की शाळा खूप चांगली आहे.येथील प्रशिक्षण तथा शिक्षण चांगले आहे.आपल्या मुलांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.शिक्षणाने देश वाचेल,शिक्षणाने देश विकला जाणार नाही.त्यामुळे माणसाला माणूस बनवणारी शिकवण द्या.शिक्षणातून मान तथा प्रसिद्धी मिळते.धार्मिक शिक्षणासोबत ख-या अर्थाने व्यवाहारिक शिक्षणाची सुध्दा समाजात फार मोठी गरज आहे आणि हि गरज या संस्थेच्या वतीने पुर्ण होत आहे.त्यानंतर अमर खानापुरे,मौलाना फेरोजसाब,डॉ.आर.आर.शेख,डॉ. अफसर शेख यांनीही मनोगत व्यक्त करताना हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य,नृत्य यांचा अविष्कार न राहता अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले.विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात.आपल्या मुलांना मोबाईल व बाहय खाद्यपदार्थापासून दूर ठेवण्याचा संदेश ही मान्यवरांनी पालकांना दिला.यावेळी चिमुकल्या मुलांनी विविध कलागुण सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्याथ्यांनी देशभक्तिपर गीते,हदीस वाचन,मोबाईलचे दुष्परीणाम, बालकामगार,संदेश पर नृत्य अशा विविध सामूहिक नृत्यावर सादरीकरण करून पालकांची तथा उपस्थितांची मने जिंकली.संस्थेच्या वतीने अलहाज हिमायत नूरइस्लाम पटेल यांना इब्राहिमसाब सरगुरु जीवनगौरव पुरस्कार तर सय्यद म. हबीब व शेख बासीद यांना राहत खिदमत-ए-खल्क पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमास लातूर रिपोर्टचे संपादक मजहर पटेल,एम.बी. एम.न्युजचे मुख्तार मणियार,पत्रकार आसिफ पटेल,जलील पठाण,उमर महेबुब शेख,अल्ताफ सिद्दीकी,कोंडाजी बागवान,इंजि.अजहर शेख,सैफुल्ला बागवान,कुर्बान शेख,अजहर पठाण,इसाक शेख,आसेफ शेख,ऍड.मजहर शेख,हुसेन पटेल,अमन शेख, परवेज शेख,आवेज शेख,गौस सय्यद,जफरअली सय्यद,उमर शेख,अमर शेख,अरबाज शेख,शिक्षिका सय्यद आयेशा,पठाण तहेनियत,पटेल तरन्नुम,शेख मुस्कान,पंजेशा बुशरा,पठाण सूरैय्या, जरीन पंजेशा,शेख रिजवाना,सिमा मणियार,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नजीर शेख यांनी केले तर आभार अरबाज शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या