पोलीस ठाणे चाकुर हद्दीत अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देशी दारूची वाहतूक करणाऱ्या 4 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 48 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई*



*पोलीस ठाणे चाकुर हद्दीत अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देशी दारूची वाहतूक करणाऱ्या 4 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 48 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा  मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई*

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर चाकुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नळेगाव शिवारातील रोडवर सापळा लावून देशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करीत असलेल्या वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली असून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार इसमा विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           दिनांक 26/02/2024 रोजी नळेगाव परिसरातून एका वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांनी बेकायेशीररित्या अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या नावाची 48 हजार 720 रुपयाची देशी दारू मिळून आली. देशी दारूची अवैध वाहतूक करीत असलेल्या चार इसम नामे

1)विकी परशुराम टोम्पे, वय 22 वर्ष,राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

2)इरफान मोहिद्दीन शेख, वय 26 वर्ष,राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

3)राम आदमाने(फरार)राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

4) नवनाथ आदमाने (फरार)राहणार नळेगाव, तालुका चाकूर जिल्हा लातूर.

            यांचेवर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी दारू व वाहनासह  एकूण 4 लाख 48 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
              पोलीस ठाणे चाकूर मध्ये  नमूद इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास चाकुर पोलीस करीत आहेत.
             
              पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या