स्वतंत्रता सेनानी कॅप्टन मोहम्मद अक्रम ➡️ ज्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावली
🟩🟩🟨🟧🟥🟪🟩🟦🟨🟧🟥🟩
पहिल्या 'इंडियन नॅशनल आर्मी'च्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावणारे कॅप्टन मोहम्मद अक्रम यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर भागात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते मलाया येथे ब्रिटिश भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून गेले आणि तेथील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर १९४० मध्ये त्यांचे सहकारी कॅप्टन मोहन सिंग यांच्यासमवेत त्यांनी मातृभूमीला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचे काम केले. मलायाच्या मध्यभागी भारतीय क्रांतिकारी चळवळ चालवणारे ज्ञानी प्रीतम सिंग आणि जपानी सैन्य अधिकारी मेजर इवाईची पुजिहारा यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर कॅप्टन अक्रम यांनी कॅप्टन मोहन सिंग यांना भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या स्थापनेसाठी निर्णय घेण्यास मदत केली. पूर्व आशियातील थायलंडची राजधानी बँकॉक येथे प्रीतम सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या 'इंडियन इंडिपेंडन्स लीग' या क्रांतिकारी संघटनेच्या उपक्रमांना कॅप्टन अक्रम यांनी प्रोत्साहन दिले. कॅप्टन मोहम्मद अक्रम यांनी सक्रियपणे 'लष्करी प्रचारक' कार्यक्रमांचे आयोजन केले, ज्यात जपानी सैन्याने युद्धकैदी म्हणून पकडलेल्या भारतीय सैनिकांमध्ये देशभक्तीला प्रोत्साहन दिले आणि ब्रिटीशविरोधी पुढे केले. कॅप्टन अक्रम यांनी 9 मार्च 1942 रोजी सिंगापूर येथे झालेल्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या निर्मितीबाबत, ब्रिटिश भारतीय सैन्याविरुद्धच्या लढ्यात भारतीय राष्ट्रीय लष्कराची भूमिका याविषयी जपानी सरकारच्या नेत्यांकडून स्पष्ट आश्वासने आणि उत्तरे मिळविण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.त्यानंतर 28 मार्च 1942 रोजी टोकियो येथे होणाऱ्या बैठकीसाठी कॅप्टन सिंग आणि कॅप्टन अक्रम यांनी 'इंडियन नॅशनल आर्मी'ची संघटनात्मक रूपरेषा आणि उद्दिष्टे नमूद करणारा दस्तऐवज तयार केला. कॅप्टन मोहम्मद अक्रम 11 मार्च 1942 रोजी जपानची टोकियो यात्रेवर निघाले . 24 मार्च 1942 रोजी कॅप्टन अक्रम यांच्या टीमला घेऊन जाणारे विमान मार्गात कोसळले. भारतीय स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन मोहम्मद अक्रम, ज्यांनी पहिल्या भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बजावली, ते या विमान अपघातात बेपत्ता झाले. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर थायलंड, मलाया, ब्रह्मदेश आणि इतर देशांत राहणारे प्रवासी भारतीय आणि क्रांतिकारकांनी विशेष सभा व बैठका घेऊन भारतीय राष्ट्रीय सेनेचे कॅप्टन मोहम्मद अक्रम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करूनश्रद्धांजली वाहिली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
संदर्भ -THE IMMORTALS 2
- sayed naseer ahamed (9440241727)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
संकलन तथा अनुवादक लेखक - *अताउल्लाखा रफिक खा पठाण सर*
सेवानिवृत्त शिक्षक
टूनकी बुलढाणा महाराष्ट्र*
9423338726
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.