जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

लातूर, दि. 26 : जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्च २०२४ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित जनजगागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे एच.व्ही. यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून करण्यात आले.

रॅलीसाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.प्रविण ढगे, डॉ.विद्या गुरुडे, डॉ.पाठक एस.जी., जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. एस.एन.तांबारे, डॉ.मोनिका पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, डॉ.अनंत कलमे, डॉ .हर्षवर्धन राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपनर डी.के., जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.

या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातून जनजागृती करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक, बस स्थानक, गंज गोलाईमार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे रॅलीची सांगता झाली. 

 बाभळगाव नर्सिग कॉलेज व विलासराव देशमुख नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.  

****  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या