मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमात भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंदोरा- भेटा शाळेला एक लाखाचे पारितोषिक.



"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" उपक्रमात भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंदोरा- भेटा शाळेला एक लाखाचे पारितोषिक.

औसा प्रतिनिधी 
शैक्षणिक सत्र 2023-24 अंतर्गत भारत माध्यमिक व उच्च माध्यामिक विदयालय अंदोरा भेटा ता औसा, या शाळेने शासनाने राबविलेल्या 'मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा "उपक्रमात औसा तालुक्यातून सर्व तृतीय क्रमांक पटकाविले.

सदरील संस्था ग्रामीण भागातील अतिशय उत्कृष्ट संस्था म्हणून नावारुपास आलेली आहे. या संस्थेची स्थापना स्व.प्रा.श्री.एन.बी. शेख साहेब व संस्थेचे पदाधिकारी सर्व संचालक मंडळ यांनी 15 जून सन 1990 साली ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतक-यांच्या कुंटुबातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी केली. त्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले दिसुन येत आहे. या विद्यालयात आज जवळ- जवळ 630 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत भेटा, अंदोरा, बोरगाव, वडजी, जायफळ या पाच गावातील विदयार्थी शिक्षण घेतात. सदरील शाळा ही 5 वी ते 12 वी पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण याच शाळेत मिळते. या विद्यालयात विविध स्पर्धात्मक परीक्षा, जसे नवोदय, स्कॉलरशीप, NMMS तसेच इतर स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी शाळेत करून घेतली जाते. एवढेच नाही तर दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी NMMS परीक्षेत

उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती साठी पात्र होतात. या शाळेतील विद्याथ्यौली क्रिडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर नैपुण्य प्राप्त केले आहे. ही एक उपक्रमशिल शाळा असून या शाळेतून आजवर अनेक डॉक्टर, इंजिनियर्स, प्राध्यापक, वकील, पोलीस, सैन्यदल, पोस्टमास्टर, तलाठी, शिक्षक, अभिनेते, पोलीस, ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार, उ‌द्योजक इ क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षणाव्यतेरीक्त व्यवहारीक ज्ञान दिले जाते. शिस्तीचे धडे शाळेत दिले जातात. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव दिले जाते. सर्वांगीण विकासावर जास्तीत जास्त भर दिला जातो. संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ नेहमीच शैक्षणिक व सामाजिक, पर्यावरण पूरक उपक्रमाबद्दल सहभागी असतात, व वि‌द्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहेत.

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातही विदयालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, स्वच्छता विषयक तसेच पर्यावरण पूरक इतर सर्व 30 बाबीचे मूल्यांकन 'मूल्यांकन समितीद्वारे' परिक्षण करण्यात आले होते. या सर्व बाबींचे अहवाल, छायाचित्रे, अभिलेखे, नोंदी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री नौशादजी शेख सर यांच्या नेतृत्वाने तसेच मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकवर्ग तसेच विदयार्थ्यांनी मिळून पूर्ण केले. म्हणूनच हे यश शाळेला प्राप्त झाले. व औसा तालुक्यातून तृतीय क्रमांक येण्याचा बहमान शाळेने मिळवला.

या यशाबददल संस्थेचे सचिव मा. श्री. डॉ. अफसर शेख, संस्थाध्यक्ष मा. श्री. जावेद शेख, सुलेमान अफसर शेख यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या