औसा / प्रतिनिधी : - औसा येथील अरहान (अब्दुल रहमान) शमशुलहक्क काझी व सफिया समीरऊलहक्क काझी या लहान वयाच्या मुला, मुलीने रमजानच्या पवित्र महिन्यात पहिला रोजा पुर्ण करून अल्लाह प्रति आपली भक्ती व्यक्त करत आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवून आदर्श निर्माण केला आहे.
मानवतेचा व दातृत्वाचा संदेश देणाऱ्या व मुस्लिम बांधवांच्या रमजान रोजांना (उपवास) मंगळवारपासून प्रारंभ झाला होता. इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, औशातील लहान वयाच्या मुला, मुलीने कडक उन्हाळ्यात जवळपास १४ तासांचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा असून तापमानात सर्वात जास्त तापमान असलेल्या मार्च महिन्यापासून सुरू झाला असून रमजानचा महीना आणि त्यात रमजान महिन्याचे पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाण्याचा एक घोट न घेता हा रोजा (उपवास) ठेवला जातो. सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पाहटे ०४ : ४५ वाजेपासून सायंकाळी ०६ : ४५ वाजेपर्यंत अन्नाचा एकही कण आणि पाण्याचा एकही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली. रमजान महिन्यातील अत्यंत महत्व असलेल्या शेवटच्या आठवड्यात रोजा राहून अरहान (अब्दुल रहमान) शमशुलहक्क काझी व सफिया समीरऊलहक्क काझी या मुला, मुलीने इफ्तारच्या वेळी सर्वाच्या सुख, शांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना (दुआ) करत आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने रोजा (उपवास) केला. यामुळे त्यांचे काझी बिरादार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.