अध्यापन क्षेत्रात 40 वर्षांच्या सेवेनंतर, मुहम्मद मुस्लिम कबीर आपल्या कर्तव्यातून निवृत्त शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक आणि सामाजिक मित्रांकडून हार्दिक शुभेच्छा.

अध्यापन क्षेत्रात 40 वर्षांच्या सेवेनंतर, मुहम्मद मुस्लिम कबीर आपल्या कर्तव्यातून निवृत्त 
 शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक आणि सामाजिक मित्रांकडून हार्दिक शुभेच्छा.


 लातूर (प्रतिनिधी) औसा  येथील हजरत सुरत शाह उर्दू शाळेचे शिक्षक श्री. महंमद मुस्लीम कबीर यांनी आपल्या अध्यापन विभागात 40 वर्षे आपले कर्तव्य बजावले ते 30 एप्रिल 2024 रोजी निवृत्त झाले.  फखरुद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटीचे अल्हाज शेख महंमद उर्फ ​​छोटे मियाँ, अड. समीउद्दीन पटेल, मुख्याध्यापक मुहम्मद शफीउद्दीन पटेल, झाकीर जरगर सर डॉ. वहीद कुरेशी यांनी महंमद मुस्लिम कबीर यांच्या शैक्षणिक, पत्रकारितेतील आणि सामाजिक योगदना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे  संचालन शेख मुजीब शब्बीर आणि आभार  बदीउद्दीन पटेल यांनी मानले. शाळे तर्फे कबीर सराना भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.  या वेळी मुहम्मद अब्दुल गनी सर, कु.रजिया बाजी, कु.शेख एम.एम.बाजी, शबाना मुंगले बाजी,शगुफता मन्यार बाजी,यासिर अराफत काझी, नजीबुद्दीन पटेल, जिलानी काझी, व इतर मित्र उपस्थित होते.
    ऑर्बिट इंग्लिश स्कूलचे सचिव ॲडव्होकेट इक्बाल शेख, अझीम ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक डॉ.खलील सिद्दीकी, सोलापूरचे सुप्रसिद्ध पत्रकार अयुब नल्लामांदु ,उस्मानाबादच्या शिक्षक संघाचे खिजर मोरवे,लातूरचे सुप्रसिद्ध पत्रकार शेख अब्दुल समद,जिलानी मुल्ला राज, उर्दू शिक्षक महंमद शरीफ हननुरे आणि संस्थेच्या इतर मित्रांनी लेखांच्या माध्यमातून महंमद मुस्लिम कबीर यांच्या शैक्षणिक,सामाजिक,पत्रकारितेतील आणि साहित्यिक सेवा यापुढेही सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
 हिंदी साप्ताहिक लातूर रिपोर्टरचे संपादक मजहर पटेल आणि कार्यकारी संपादक ऍडव्होकेट इक्बाल शेख यांनी सांगितले की, श्री. मुस्लीम कबीर यांचे सार्वजनिक जीवन आणि सेवा यावर आधारित विशेषांक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या