अपंग गौस शेख यांचा शाहीन अकॅडमी लातूर च्या वतीने सत्कार..चक्क पायाच्या बोटात पेन धरुन पेपर लिहून 12 वीचा विज्ञान शाखेत गगणभरारी घेतली

 दोन हाथाने अपंग  गौस शेख यांचा शाहीन अकॅडमी  लातूर च्या वतीने  सत्कार..

अपंग गौस शेख यांचा शाहीन अकॅडमी लातूर च्या वतीने सत्कार..चक्क पायाच्या बोटात पेन धरुन पेपर लिहून 12 वीचा विज्ञान शाखेत गगणभरारी घेतली



 



लातूर.


 लातूर जिल्ह्यातील वसंतनगर येथील रेणुकादेवी उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२ वीचा विद्यार्थी दोन्ही हात नसलेल्या गौस अमजद शेख या दिव्यांग विद्यार्थ्यांने 

चक्क पायाच्या बोटात पेन धरुन पेपर लिहून 12 वीचा विज्ञान शाखेत गगणभरारी घेतली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे रोजी जाहीर करण्यात आला.12 वी परिक्षेच्या निकालात हा लातूर पॅटर्नचा हा दबदबा कायम राहीला.इयत्ता 12 वीचा विद्यार्थी गौस अमजद शेख 

खांद्यापासून दोन्ही हात नाहीत. परंतू, त्याने कधीही जिद्द सोडली नाही. विज्ञान शाखेत असलेल्या गौस शेख यांने अपंगत्वावर मात करुन फेब्रुवारी-मार्च २०२४ ची बोर्ड परीक्षा दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांना रायटर घेण्याची सवलत आहे. परंतू, गौस शेख याने रायटर न घेता पायाच्या बोटात पेन धरुन उत्तर पत्रिका लिहिली आणि तो विज्ञान शाखेतून ७८ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. गौस शेख यास नियतीनेच दोन्ही हात दिले नाहीत. परंतू, गौस शेख कधीच खचला नाही. त्याने बारावी विज्ञान परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. त्याने भविष्यात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. इयत्ता १० वीतही त्याने ८९ टक्के गुण


मिळवले होते. 

 अपंग गौस शेख


बारावी (HSC ) परीक्षेत 78% गुण प्राप्त करणाऱ्या अपंग ( दोन्ही हात नसलेल्या ) *गौस अमजद शेख* याचा सत्कार *शाहीन अकॅडमी चे मुख्य समन्वयक मोईज भाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  दोन्ही हात नसल्यामुळे या विद्यार्थ्याने त्याची परीक्षा पायाने लिहून दिली. त्याच्या या यशाबद्दल सर्वानी त्याचे कौतुक केले. 

*"शाहीन अकॅडमी च्या वतीने गरजू व होतकरू मुलांना  NEET / JEE, स्पर्धा परीक्षा च्या तयारीसाठी सर्वतोपरी सहकार्य करुत असे मोईज शेख यांनी सांगितले. 

गौस शेख याला त्याचे शिक्षक आडे सर यांनी मार्गदर्शन केले. माझ्या यशात आडे सरांचे मोठे योगदान आहे असे गौस शेख याने म्हंटले. या प्रसंगी गौसचे वडील अमजद फकीर, आई तसेच शाहीन अकॅडमी चे समन्वयक अल्ताफ शेख. शाहीन अकॅडमी चे सल्लागार डॉ रईस पठाण, मुखतार भाई इंजिनियर, युनूस भाई. माजिद पठाण, नुसरत कादरी सर ,  सुरेश चौहान, सादिक पटवारी, अमजद पठाण, मौलाना अब्दुल बारी साहब, नितीन काजळे, नबी शेख, आरेफ शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या