लातूर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

 लातूर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

    





लातूर (प्रतिनिधी )

      माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष  २०२३-२४ बारावी बोर्ड परीक्षेत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ सायन्स ने यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून १० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक अंकुर महादेव बंडगर ६८.७१, द्वितीय क्रमांक मानसी बालाजी थोरमोठे ६७.१७, तृतीय क्रमांक भक्ती कल्याणकर देशपांडे ६१.६७ गुण घेऊन महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे .या गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे , प्राचार्य राजशेखर चौधरी, प्रा. माधुरी बावगे,प्रा. शुभम वैरागकर प्रा.प्रज्ञा वागदरे ,प्रा. हर्षदा नलगे प्रा.योगेश कवळीकर, प्रा. नौशाद पटेल ,प्रा. स्नेहा तरकसे, प्रा.परमेश्वर बिराजदार ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे, आदीसह शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या