रामनाथ कनिष्ठ महाविद्यालयचा 89% तर एमसीवीसी विभागाचा 94% निकाल
श्री रामनाथ कनिष्ठ महाविद्यालय अलमला ता औसा जि लातूर येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एम सी व्ही सी) विभागाच्या क्रॉप सायन्स व इलेक्ट्रिकल विभागाचा 100% निकाल लागला असून ऑटोमोबाईल विभागाचाही 78 टक्के निकाल लागला आहे .श्री रामनाथ कनिष्ठ कला महाविद्यालयचा 88.88% निकाल लागला असून विद्यालयातून सर्वप्रथम कला शाखेची कु. फकीर सानिया महेबूब 87.83% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आलेली आहे. तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एम सी व्ही सी) विभागाचे एकूण 47 विध्यार्थी फेब्रुवारी 2024 बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 44 विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा निकाल 94 टक्के लागला आहे ,एम सी व्ही सी विभागातून कु सृष्टी जाधव 81.33 % (पिकशास्त्र), प्रथम आली आहे,तर कु आडगळे निकिता (इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजि) 79.00 घेऊन द्वितीय अली आहे, तर लक्ष्मी मुधोलकर 78.17 % घेऊन तृतिय अली आहे याशिवाय कु ऋतुजा सूर्यवंशी 78.5%इलेक्ट्रिकल ,कु बोकडे निकिता 78.5% इलेक्ट्रिकल ,कु मुळे प्रणिता 78.17%इलेक्ट्रिकल कु सुरवसे नंदिनी 76.5%इलेक्ट्रिकल विशेष प्रविण्यात उत्तीर्ण झाले आहेत, तसेच 28 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर 9 विध्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तसेच कला शाखेतून कुमारी जाधव प्रिया विजय 81.17 कुमारी यादगिरी नंदिनी सिद्धेश्वर 79.67 गुण घेऊन ग्रामीण भागात आपल्या गुणवत्तेचा आदर्श निर्माण केला आहे तसेच कला शाखेत ही एकूण 32 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेले असून विशेष प्राविण्यात 3, प्रथम श्रेणी 13, द्वितीय श्रेणीत16विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा निकाल 88.88% लागला आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक श्री मुळे पी के, श्री दांडगे बी जे ,श्री चव्हाण बी डी, श्री भिंगोले बी बी,श्री बिक्कड डी डी. श्री हुंडेकर एम बी,श्री कदम ए एस यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ऍड उमाशंकर पाटील ,सचिव प्रभाकर कापसे उपाध्यक्ष शिवाजीराव आंबुलगे, कोषाध्यक्ष श्री चंनबसप्पा निलंगेकर सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे, संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा जी एम धाराशिवे , श्री सोपान काका अलमलेकर, श्री मनमतआप्पा धाराशिवे, श्री शिवसांब हुरदळे, वीरनाथ हुरदळे ,नरेंद्र पाटील संस्थेचे सर्व सभासद कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता पाटील पर्यंवेक्षक पी सी पाटील सर आणि सर्व प्राध्यापकांनी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.