जी.डी.सी.अँड ए परीक्षेला 24 मेपासून प्रारंभ

 जी.डी.सी.अँड ए परीक्षेला 24 मेपासून प्रारंभ





लातूरदि. 20 (जिमाका) : सहकार आयुक्त व निबंधकसहकारी संस्थामहाराष्ट्र राज्यपुणे यांच्या कार्यालयामार्फत 24,25 व 26 मे2024 रोजी जी.डी.सी.अँड ए परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर शहरातील सिग्नल कॅम्प शासकीय रूग्णालयासमोरील श्री मारवाडी राजस्थान विद्यालय येथे ही परीक्षा होईल.

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळालेले नाही अथवा मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी पॅनकार्डनिवडणूक ओळखपत्रड्रायव्हिंग लायसन्स व अनुषंगिक फोटो ओळखपत्रासह जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्थाप्रशासकीय इमारतजुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरलातूर येथे किंवा 02382-245193 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अथवा परीक्षेच्या दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा चीफ कंडक्टर, जी.डी.सी.अँड ए परीक्षा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या