संगणक क्रांतीचे जनक,माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना मांजरा कारखाना येथे आदरांजली.

 संगणक क्रांतीचे जनक,माजी पंतप्रधान

भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना मांजरा कारखाना येथे आदरांजली.





विलासनगर :-- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे भारत देशाच्या  आधुनिक विकासाची मुहूर्त मेढ रोवणारे व त्यातून देशात संगणक क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने कारखाना स्थळी असलेल्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी
अभिवादन करताना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री पंडित देसाई, चिफ अकौटंट श्री शरद सांळुखे, डिस्टलरी ईचार्ज श्री वाय. एस. देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी श्री पी.एस.शेळके, परचेस ऑफिसर श्री एस.बी.गोसावी, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख ,एस एस देशमुख आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या