भारत देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे लातुर लोकसभेचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करा सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख संविधान चौकातील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा

 

भारत देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि
आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी

महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे लातुर लोकसभेचे उमेदवार
डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करा

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
संविधान चौकातील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा




लातुर प्रतिनिधी : दि. ५ मे २०२४
भारत देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या उज्वल
भविष्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांना प्रचंड मताधिकक्याने संसदेत पाठवून सध्याचे भाजप खासदार सुधाकर
शृंगारे यांना मतदारांनी सन्मानपूर्वक निरोप द्यावा, असे आवाहन सहकार
महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. महाविकास आघाडीचे
उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूरच्या संविधान चौकात
आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
लातुर लोकसभा मतदार संघातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून दि. ७ मे
रोजी मतदान पार पडणार आहे. या अनुषंगाने सहकार महर्षी माजी मंत्री
दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातुर लोकसभा मतदार संघातील
महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या
प्रचारार्थ शनिवार दि. ४ मे रोजी सायंकाळी लातुर शहरातील बार्शी रोड
भागातल्या संविधान चौक या ठिकाणी जाहीर प्रचार सभा पार पडली.
यावेळी बोलताना सहकार महर्षी माजी मंत्रीमंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले
की, आपण १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झालो पण २६ जानेवारी रोजी आपल्याला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली आणि म्हणूनच आपण आपल्या देशात दोन
राष्ट्रीय सण साजरे करतो. हिंदू धर्मात जसे भगवत गीता, मुस्लिम धर्मात
कुराण आहे, तशी आपली लोकशाही अबाधित ठेवणारे पवित्र असे संविधान आहे. हे
संविधान आपल्याला टिकवून ठेवायचे आहे, त्या घटनेला विद्यमान सरकार चीन
सारख्या देशाकडून प्रेरणा घेऊन बदलण्याचा विचार करीत असून त्यासाठी अबकी
बार चारसो पार असा नारा देत आहेत. म्हणून भारतात गेली ७० वर्ष टाकलेल्या
घटनेचे शिलेदार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भारत देशातील नागरिक
हेच आहेत हे विसरून चालणार नाही असे ते म्हणाले.
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोट बंदी केली काळा पैसा
येणार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येणार असे म्हणाले पण काळा पैसा
आला नाही आणि १५ लाख भारतीयांच्या खात्यावर जमा झाले नाही, कोविड काळात
अचानक भारत देश व लॉक डाऊन केला संबंध देशवासियांना घरात कोंडून उद्योग
बंद पडले आणि युवकांच्या नौकार्या घालवल्या असे काम १० वर्षात केले आणि
आता याना संपूर्ण घटना बदलून टाकायची असून आज जसे मोदी सरकार म्हणतात तसे
उद्या आपली भारतीय घटना मोदींची घटना होईल असा त्यांचा डाव आहे, आणि हा
डाव आपल्याला हणून पडायचा आहे.

जातनिहाय जनगणना करावी लागेल
पण्‍ याला भाजपचा विरोध आहे
माजी मंत्री दिलीपराव देशमुख
आजही देशात सामाजीक, राजकिय, शैक्षणीक, आर्थिक समानता आणायची असेल तर
जातनिहाय जनगणना करावी लागेल पण्‍ याला भाजपचा विरोध आहे.  आमचे नेते
राहुलजी गांधी यांनी प्रकाशित केलेल्या ५ न्याय ग्यारंटी कार्डमध्ये
इंडिया आघाडीने जनतेच्या हातात दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
राहूलजी गांधी यांच्यात फरक असून न होणाऱ्या गोष्टी पंतप्रधान सांगतात जे
आपण गेल्या १० वर्षात अनुभवतो आहे पण राहुलजी गांधी जे होणार तेच
अश्वासने देतात यांच्या सारख्या भूल थापा देत नाहीत.याचा आपण सर्वांनी
विचार करावा आणि आपल्या व आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी
विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना आपण सर्वांनी सन्मान पूर्वक निरोप
द्यावा आणि आपले महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी
काळगे यांना प्रचंड आशा मताधिकक्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि
संविधान वाचविण्यासाठी संसदेत पाठवावे असे आवाहन हजारोच्या संख्येने
उपस्थित असलेल्या जनसमुदायाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.

चौकट
देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार
माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, भारतात बदलाचे
वारे वाहू लागले आहे़ त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे़
संपूर्ण देशातील मतदारांनी इंडिया आघाडीला कौल देण्याचा संकल्प केलेला
असल्यामुळे देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे़ अबकी बार चारसौ पार
नाही, दोसौ पारसुद्धा नाही़ लातूरमध्येही मतदारांनी डॉ़ शिवाजी काळगे
यांना निवडुन देण्याचे ठरवले आहे़ त्यामुळे डॉ़ शिवाजी काळगे मोठ्या
मताधिक्क्याने निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़.
रेल्वे कोच फॅक्टरीच्या नावावर किती निवडणुका लढणार?, असा प्रश्न उपस्थित
करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, रेल्वे कोच फॅक्टरीतून
नेमके कशाचे उत्पादन होणार, याची स्पष्ट माहिती भाजपाला आजपर्यंत देता
आलेली नाही़ तेथे नूसताच सांगाडा उभा केलेला आहे़ या उलट काँग्रेस
महाविकास आघाडीने लातूरला एअर कार्गो हब करण्याचा संकल्प केला आहे़
त्याद्वारे शेतमालाची देशभर आणि देशाबाहेरही निर्यात करता येणार आहे़
उडाण योजनेअंतर्गत लातूरहून विमानसेवा सुरु केली जाणार आहे़ केंद्रातील
विविध योजना लातूरला खेचून आणण्याकरीता डॉ़ शिवाजी काळगे यांना प्रचंड
मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले़.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
लातुर लोकसभा निवडणूकीची सांगता सभा आज लातूरच्या संविधान चौकात होत असून
या सभेच्या ठिकाणापासून आपण संविधान वाचवण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना
निवडुन आणण्यासाठीचे हे स्थळ एक शुभ संकेत म्हणावा लागेल. आज पंजा बोलतो
आहे कमळाची पोल  खोलू लागला आहे. भरताची आजची राजकीय परिस्थिती पाहता आणि
जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अबकी बार चारसो पार नाही तर
दोनशेच्या जवळ देखील जातील की नाही यात शंकाच आहे. भाजपच्या खासदारांनी
कधी आपल्याकडे पाहिले नाही, कधी तुमच्या सुख दुःखात धावून आले नाहीत,
आपल्याला पाणी मिळते का, आपल्या गल्लीतील कचरा उचलला जात नाही याकडे लक्ष
नाही, जागतिक महामारीच्या काळात घरात बसून होते कारण त्यांच्या पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी त्यांना आवाहन केले होते घराबाहेर पडू नका. त्यांचे
आवाहन या खासदारांनी तंतोतंत पळाले आणि असा खासदार आपणास हवा की मग
आपल्या अडचणीत धावून येणारे डॉ शिवाजी काळगे आपले खासदार असावेत, याचा
आपण विचार करावा. आपल्या लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचे आहे,
आपल्या लातूरला वंदे भारत रेल्वे आणायची आहे, एअर कार्गो हब लातूरला सुरू
करायचे आहे, दळण वळण सुविधा वाढवायच्या आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्था
बिघडली आहे, ती सुधारायची आहे,वाढलेला भ्रष्टाचार संपवायचा आहे, विद्यमान
भाजप सरकारचा पायाच भ्रष्टाचारावर उभारला गेला आहे.सत्तेतून पैसा आणि
पैशातून सत्ता यांनी अंगिकारले आहे यांनी देशातील १६ सरकारे यांनी या
भ्रष्टाचारातील पैशातून पाडले असून दोन मुख्यमंत्री गजाआड केले असे काम
या सरकारचे सुरू असून आता जनता पूर्ती जाणून आहे.

जनतेने ठरविले आहे अबकी बार
भ्रष्टाचारी भाजप सरकार तडीपार
डॉ शिवाजी काळगे

आता जनतेने ठरविले आहे अबकी बार भ्रष्टाचारी भाजप सरकार तडीपार असे
जनतेने ठरविले असून आपल्या कामाचा, आपल्या संपर्कात असलेला आपला उमेदवार
म्हणून डॉ शिवाजी काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य द्यावे आणि आलेल्या
संधीचे सोने करावे आणि आपल्या लातुरला असलेली राजकिय परंपरा, लातुरची
संस्कृती आपल्याला मिळाली आहे ती म्हणजे आदरणीय माणिकराव सोनवणे,आदरणीय
लोकनेते विलासराव देशमुख, आदरणीय माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील
निलंगेकर, आदरणीय शिवराज पाटिल चाकूरकर यांच्याकडून आणि ती परंपरा यापुढे
आपल्याला राखायची आहे आणि अज्ञान विरुद्ध विज्ञान,साक्षर विरुद्ध
निरक्षर,केजी विरुद्ध पीजी अशी लढाई असून आपन डॉ शिवाजी काळगे यांना साथ
द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

लातुर मध्ये एकच फॅक्टर चालणार
तो म्हणजे डॉ शिवाजी काळगे फॅक्टर
आमदार धीरज देशमुख
यावेळी बोलताना लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले की, ज्या
दिवशी आपण डॉ शिवाजी काळगे यांचा अर्ज दाखल केला त्या दिवशीची सभा आणि
आजची सभा एकच सांगते की लातुर मध्ये एकच फॅक्टर चालणार तो म्हणजे डॉ
शिवाजी काळगे फॅक्टर आणि या आपल्या अभूतपूर्व साथ पाहता ही निवडणूक
जनतेने हातात घेतली आहे हे आवर्जून सांगावे लागेल. देशात आज वाढती
महागाई, वाढती बेरोजगारी, मजुरांना मजुरी मिळत नाही महिला सुरक्षित नाहीत
आणि असे असताना छोट्या छोट्या गोष्टीवर आंदोलन करणारी भाजपा आणि त्यांचे
नेते मागील १० वर्षांपासून गप्प का आहेत असा सवाल उपस्थित करित या
निवडणुकीत आपला प्रतिनिधी कसा असावा हे डॉ शिवाजी काळगे यांना बहुमताने
विजयी करून लातुर पॅटर्न दाखवून देतील असा विश्वास व्यक्त त्यांनी यावेळी
केला.

यावेळी बोलताना डॉ.शिवाजी काळगे म्हणाले की, लातुर लोकसभा निवडणुकीच्या
निमित्ताने आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र आलो आहोत. या निवडणुकीत
आपण सर्वांनी उन्हाची तमा न बाळगता ही निवडणूक आपल्या हातात घेतली
असल्याचे चित्र पाहायला मिळत असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत आणि
म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लातुर मध्ये प्रचार सभा घेण्याची
वेळ आली आहे. विद्यमान सरकारने गेल्या काळात चुकीचे धोरणे राबवून
आपल्याला अडचणीच्या खाईत लोटले आहे याचा विचार आपण करावा आणि तुमच्या
अडचणी सोडवण्यासाठी मी २४ तास ३६५ दिवस  ५ वर्ष कार्यरत राहीन असा शब्द
देत बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती केली.
यावेळी बोलताना आपल्या शायरी मधून मालेगाव या ठिकाणाहून आलेल्या वाहिद
अन्सारी यांनी विद्यमान सरकारचा बोगस कारभार आणि राज्यातील मविआ व
देशातील इंडिया आघाडी, काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेल्या बलिदानाची
त्यांच्या कार्याची, थोर महापुरुषांनी देशासाठी दिलेले योगदानाची तसेच
आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आदरणीय शिवराज पाटील
चाकूरकर,यांनी त्यांच्या राजकिय कारकीर्दीत सर्व सामान्य माणसाच्या करिता
केलेल्या कामाची माहिती आणि आपल्या सोबत सहकार महर्षी माजी मंत्री
दिलीपराव देशमुख यांची ताकद आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी लातुर साठी केलेल्या विकासकामांची व त्यांच्यातील सर्व सामान्य
जनते विषयी असलेली आस्था,प्रेम याबद्दल उपस्थिताना अवगत करीत डॉ शिवाजी
काळगे यांना प्रचंड मताधिकक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे म्हणाले की,या निवडणुकीत भाजप
म्हणते अबकी बार चारसो पार असे यांनी काय काम केले याचा विचार आपण करावा
आणि आणि या भूल थापा देणाऱ्या भाजपला यांची जागा दाखवून डॉ शिवाजी काळगे
यांना निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी बोलताना ऍड. उदय गवारे म्हणाले की, लातुर लोकसभा मतदार संघातील
मविआ चे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केले
असून आता भाषण नाही तर आपण सर्वांनी एकच लक्षात घ्यावे एकच फॅक्टर आपले
उमेदवार डॉक्टर हे ७ तारखे पर्यंत लक्षात ठेवावे ही सभा आपली विजयाची सभा
आहे असे म्हणत डॉ शिवाजी काळगे यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी
सर्वांना केले.
यावेळी बोलताना राजा मणियार म्हणाले की, सध्याची निवडणूक लोकसभेची
निवडणूक असून आपल्या देश वासीयांचे भविष्य घडविण्यासाठी आणि संविधान
वाचविण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असून आपण ७ मे रोजी डॉ शिवाजी
काळगे यांना बहुमताने विजयी करावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना लक्ष्मण कांबळे म्हणाले की, आजची ही लोकसभा निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर आयोजित सभा असून याचे आयोजन लातूरच्या संविधान चौकात केले
असून या ठिकानाहून आपला संविधान वाचवण्यासाठीच्या लढ्याची सुरुवात असून
यासाठी आपण परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्यासाठी
कुठल्याही अफवाना बळी न पडता आपले उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांना
हाताच्या पंजा समोरील बटन दाबून त्यांना संसदेत पाठवावे अशी विनंती
उपस्थिताना केले.
यावेळी प्रस्ताविक करताना दीपक सुळ म्हणाले की, आजची सभा भारताचे संविधान
वाचविण्यासाठी आयोजित केलेली सभा आसून आदरणीय लोकनेते माजी मुख्यमंत्री
विलासराव देशमुख यांचे विचार पुढे नेणारी ही सभा आहे. आजच्या सभेसाठी
आलेले मतदार पाहता उद्याच्या लातुरच्या आणि देशाच्या उज्वल भविष्य
घडविण्यासाठीची ही सभा आहे.आजची लोकसभा निवडणूक ही जनतेने आपल्या हातात
घेतली असून ही नुसती गर्दी नसून नरेंद्र मोदी विरोधी लाट आहे असे म्हणले
तर चुकीचे नाही असे म्हणत डॉ शिवाजी काळगे यांना निवडून आणण्याचे आवाहन
त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, निरीक्षक सर्जेराव मोरे, संजय शेटे,
राजा मणियार, मोईज भाई शेख, ऍड.दीपक सुळ, इम्रान सय्यद, गणेश
एस.आर.देशमुख, लक्ष्मण कांबळे, सूर्यकांत कातळे, सचिन बंडापल्ले, दत्ता
सोमवंशी, नागसेन कामेगावकर, ऍड.समद पटेल,रत्नदीप अजनिकर,डॉ बालाजी
सोळंके, बशीर शेख, प्रा.शिवजी जवळगेकर,अहेमद खान पठाण,सुमन चव्हाण,अमर
खानापूरे,अजय भगत,ऍड.उदय गवारे, प्रा.प्रवीण कांबळे,प्रवीण
सुर्यवंशी,ऍड.दीपक राठोड,छायाताई चिगुरे,सुपर्ण जगताप, पुनीत पाटील,पिंटू
साळुंके,प्रा.संजय ओहोळ,संभाजी सुळ,चाँद पाशा इनामदार, रामदास
पवार,ऍड.विजय गायकवाड,रविशंकर जाधव,आनंद भाई वैरागे, अय्युब मणियार,विकास
वाघमारे,गोटू यादव,महादेव बरुरे, डॉ.रुपाली साळुंके,विद्याताई पाटील,
सुधाकर साळुंके,व्यंकटेश पुरी,मोहन सुरवसे,राज क्षीरसागर यांच्यासह लातुर
शहर काँग्रेस कमिटी सर्व सेलचे पदाधिकारी, सदस्य आणि प्रभाग क्रमांक
१०,११,१२ व १३ मधील नागरिक, महिलाभगिनी, युवक, व्यापारी उपस्थित होते.

विविध सवंघटनांचा डॉ. काळगे यांना पाठींबा
दरम्यान तक्षशीला महिला मंडळ, शेतकरी संघटना, जी २४ ग्रुप, शेरे हिंद
टिपू सुलतान संघटना, स्वराज्य संघटना, लातुर मोटार मालक संघ यासह अनेक
संघटनानी यावेळी आपला जाहीर पाठिंबा डॉ. शिवाजी काळगे यांना दिला.

 ---------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या