मतदानादिवशी कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी

 मतदानादिवशी कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी





 लातूरदि. 05 : लोकसभा निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे2024 रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे.कामगारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी मतदान होत असलेल्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनकेंद्र शासन व खाजगी कंपन्या, सर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेनाट्यगृहे. व्यापारऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमॉल्सरिटेलर्स आदी सर्व आस्थापनाकारखानेदुकाने इत्यादींना ही सुट्टी लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगारअधिकारीकर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्रापत न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याची तक्रार मतदारांकडून प्राप्त झाल्यास संबंधिताविरुद्ध विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी म्हणून राजेंद्र एम.जी. (मो.नं. 9420871895), ताठे आर.के. (मो.नं. 9420763111) व राठेाड गुलाब (मो.नं. 9881499747) यांच्याशी संपर्क साधावे, असे अवाहन लातूर सहाय्यक आयुक्त कामगार तथा उपविभागीय कामगार आयुक्त यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या