न्याय-हक्कांसाठी संघटित होऊन कामगारांनी हितसाधावेःकामगार नेते राजकुमार होळीकर
किल्लारी :आर्थिक समता आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर कष्टकरी कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी व कामगार हिताचे अधिक कायदे आणण्यासाठी संघटित होणे, ही आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र जनरल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा असंघटित कामगार, कर्मचारी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजकुमार होळीकर यांनीऔसा तालुक्यातील किल्लारी येथे केले.
अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना किल्लारी
शाखेच्या वतीने 24 मे रोजी इनामनगर येथील मूहमदिया फंक्शन हॉल येथे आयोजित कामगार मेळावा व कामगार नोंदणी कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजकुमार होळीकर हे बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किल्लारीचे सरपंच युवराज गायकवाड हे होते. तर यावेळी फयजोद्दीन मौलाना, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालू पठाण, अ.म.ज. कामगार संघटनेचे किल्लारी शाखेचे सचिव मूज्जमिल शेख, पत्रकार शिवाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
दत्ताभाऊ गायकवाड, भाग्यश्रीताई भोसले, विकास मोरे, अल्लाउद्दीन शिरगापुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कामगार हे नवनिर्मितीचे काम करत असतात. देशाच्या विकासाचे खरे शिल्पकार हे कामगारच आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्थानासाठी अधिक कायदे आणण्याची गरज आहे. त्यासाठी कामगारांनी संघटित होऊन पाठपुरावा करावा ला- गेल पर्यायाने संघर्ष करावा लागेल. सदध्यस्थीतीत सर्व स्तरातील कामगारांनी आपण कामगार असल्याची नोंदणी करून शासनाच्या विविध उपलब्ध योजनांचा लाभ घेतला पाहिजे. असे आवाहन राजकुमार होळीकर यांनी उपस्थित कामगारांना केले.
मेळाव्याचे सुत्रसंचलन व संयोजन लालू पठाण व मूज्जमिल शेख यांनी केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी अब्दुल शेख, बाबू शेख, हनिफ बागवान, मुबारक शेख, लखन बागवान, ताजुद्दीन शेख, चांद शेख, इस्माईल शेख, मुजीब शिरगापुरे, कासीम शेख, समीर शिरगापुरे, शोकत शेख आदि सह संघटने चे पदाधिकारी नी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.