चार हजार पेक्षा अधिक बीजगोळे बनविण्यात आली.
ग्रीन लातूर वृक्ष टीम व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्ताने बीज गोळे किंवा सीड बॉल बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमामध्ये लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ. वर्षा घुगे ठाकूर मॅडम यांनी सक्रिय सहभाग नोंदवून बीजगोळे बनविले.
आज गुरुवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या रंगनाथ झालेल्या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमा निमित्त जिल्हाधिकारी सौ वर्षा घुगे ठाकूर यांच्या द्वारे भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व बुद्ध पौर्णिमा निमित्त बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ वृक्षाचे रोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपालिका सहआयुक्त माननीय श्री रामदासजी कोकरे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य श्री जाधव सर, ग्रीन लातुर वृक्ष टीमचे सर्व सदस्य व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
या सर्वांनी मिळून चार हजार पेक्षा अधिक बीजगोळे किंवा सीड बॉल बनविले. या बीज गोळ्यामध्ये विशेष:ताने तुळशीच्या बिया, सब्जाच्या बिया पिंपळाच्या बिया होत्या. ग्रीन लातूर पेक्षा टीम द्वारे गेल्या वर्षीपासून तुळशीच्या रोपांचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये रक्षाबंधन निमित्ताने सहा हजार तुळशीच्या बियांच्या राख्या बनवण्यात आल्या होत्या, भेटतील त्या व्यक्तींना तुळशीच्या बियांचे पॅकेट वाटप करण्यात येत असतात, अंदाजे १५ ते २० हजार तुळशी बियांची पॅकेटे आज पर्यंत वाटप करण्यात आलेली आहेत. हाच उपक्रम पुढे घेऊन जात असताना तुळशी बियांचे सीडबॉल किंवा बीज गोळे आज बनवण्यात आले आहेत. यासोबतच काळी गुंजा, लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा, पांगारा, पळस पापडी, आपटा, सब्जा, लाजवंती, काटे सराटा, बहावा, कडुलिंब अशा दुर्मिळ आयुर्वेदिक उपयोगाच्या वनस्पतींच्या बिया बीज गोळे बनवण्यासाठी वापरण्यात आल्या. हे बीज गोळे बनवण्यासाठी लाल माती, काळी माती, शेणखत, मुंगी पावडर यांचे योग्य मिश्रण करून बीज गोळे तयार करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी स्वतः बीज गोळे बनवून सदस्यांना व आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. लातूर जिल्ह्याचे हरित आच्छादन वाढवण्याकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीमने मागील १८१९ दिवसांपासून अखंड अविरतपणे श्रमदान केले, प्रयत्न केले ते अत्यंत मोलाचे असून यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे याबद्दल जिल्हाधिकारी मॅडम यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांचे कौतुक केलं.
तयार झालेली बीजगोळे ही आयुर्वेदिक औषधांच्या उपयोगाची असल्याने आयुर्वेदिक दृष्ट्या उपयोगाची असल्याने आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या बिया असल्यामुळे त्यांची उगवण क्षमता ही जास्त आहे विशेष:ताने तुळशीच्या बियांची उगवण क्षमता ही खूप जास्त असते, कमी पावसात या बिया लवकर रुजतात, रोप उगवतात आणि परत याच्या मंजुळा आल्यानंतर एका झाडापासून शे-दोनशे बिया होऊन त्यांचा प्रसार होतो. वडवळ नागनाथ बेट, हत्ती बेटचं जंगल, येडशीच जंगल या ठिकाणी श्रावण महिन्यात ह्या बीजगोळ्यांचं रोपण करण्यात येणार आहे. आणि हे रोपण झाल्यानंतर त्यापासून निश्चितच काही प्रमाणात झाडं उगवतील असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
आजचा हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी बियांचे संकलन करण्यापासून, मातीचे मिश्रण करण्यापासून, बीज गोळे बनवण्यासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.