ज्ञानसागर विद्यालयची यशाची परंपरा कायम

 ज्ञानसागर विद्यालयची यशाची परंपरा कायम


     








 श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव अंतर्गत  ज्ञानसागर विद्यालय हासेगाव तालुका औसा जिल्हा लातूर शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४ मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश. संपादन केले. शाळेचा निकाल ९६.२९ टक्के लागला असून विशेष प्राविण्‍यामध्ये ३८ विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीमध्ये आठ विद्यार्थी व द्वितीय श्रेणी मध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तसेच प्रथम क्रमांक

 कु.सोमवंशी प्रणिता ज्ञानेश्वर ९३.६०% ,

द्वितीय क्रमांक सुरवसे किशोर शेषराव ९०.८०% ,

तृतीय क्रमांक शेलार प्रणिता संतोष ९०.६०% व 

बुरबुरे शिवकन्या गणेश. ९०.६०% घेऊन यश संपादन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे, उपाध्यक्ष सौ जयदेवी बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, संचालक श्री नंदकिशोर बावगे, माधुरी बावगे, सीमा बावगे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री कालिदास गोरे ,सहशिक्षक श्री कुटवाड सर, श्री मुलगे सर, श्री पाटील सर, श्री कोकाटे एस. के, श्री लांडगे सर, श्रीमती  बावगे एस .पी., श्रीमती मुपडे मॅडम, श्री जाधव बालाजी व मुस्तफा पठाण या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या