श्री रामनाथ विद्यालयाचा 99% निकाल

 

श्री रामनाथ विद्यालयाचा 99% निकाल




आलमला.  आलमला तालुका औसा जिल्हा लातूर येथील श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2024 मध्ये झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 99% इतका उच्चांकी लागला असून विद्यालयाने आपली गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये गुणानुक्रमे शाळेमधून प्रथम आलेले विद्यार्थीनीं कु, धाराशिवे रूपाली धनंजय 92.40 द्वितीय कु.पटेल तंजिला जावेद 91.20 तर तृतीय बोकडे सौरभ संतराम 90.60  असे गुणानुक्रमे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात 26 विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले असून 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 16 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत .या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष अँड उमाशंकर पाटील, उपाध्यक्ष श्री शिवाजीराव आंबुलगे, सचिव श्री प्रभाकर कापसे सहसचिव प्रा. नंदकिशोर धाराशिवे कोषाध्यक्ष श्री चंबसप्पा निलंगेकर संस्थेचे संचालक श्री सोपानराव आलमलेकर ,श्री गुरुलिंग धाराशिवे ,श्री वीरनाथ हुरदळे, श्री मनमथप्पा धाराशिवे ,श्री शिवसांब हुरदळे श्री नरेंद्र पाटील तसेच सर्व संस्थेचे सभासद मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील पर्यवेक्षक श्री पी सी पाटील दहावीचे वर्गशिक्षक श्री आंबुलगे आर एस  श्री पंडगे एन एन यांनी व विद्यालयातील इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक , प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामीण भागातील या यशाबद्दल  विद्यालयाचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या