पी.एस क्लासेस औसा येथे गुणवंताचा सत्कार संपन्न. दैदीप्यमान उज्ज्वल यशाची परंपरा कायम.

 पी.एस क्लासेस औसा येथे गुणवंताचा सत्कार संपन्न.


दैदीप्यमान उज्ज्वल यशाची परंपरा कायम. 












औसा(प्रतिनिधी) प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागला असून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निकालात पी.एस. क्लासेसचा दबदबा या निकालामुळे कायम राहिला आहे.क्लासेस मध्ये नामवाड संकेत संभाजी या विद्यार्थ्यांने 97.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. सगरे आरती अजय हिने 96.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर बानीकर अफान मुज्जकीर या विद्यार्थ्यांने 95.00 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेच

मार्च 2024 मध्ये विज्ञान विषयातील 100 पैकी 99 गुण घेऊन नामवाड संकेत प्रथम.90 पेक्षा जास्त गुण घेणारे 17 विद्यार्थी.80 पेक्षा जास्त गुण घेणारे 42 विद्यार्थी

तसेच गणित विषयातील 100 पैकी 98 गुण घेऊन साळुंखे प्रज्वल प्रथम तर 85 पेक्षा जास्त गुण घेणारे 24 विद्यार्थी.इंग्रजी विषयात 100 पैकी 94 गुण घेऊन नामवाड संकेत प्रथम,93 गुण घेऊन शेख अर्शीया द्वितीय व 80 पेक्षा जास्त गुण घेणारे 18 विद्यार्थी आहेत.क्लासेस तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चव्हाण साहेब यांनी सांगितले कि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काय लागतं याचं योग्य मार्गदर्शन पी. एस.क्लासेस वतीने केलं जातं.त्यांनतर आपले विचार व्यक्त करताना शेख अंजुम मॅडम यांनी विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना सांगितले कि जीवनात कांही तरी मोठं बनण्या अगोदर एक चांगलं माणूस बना, त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज भासणार नाही.पी. एस.क्लासेस ची सर्व टीम खूप मेहनती असुन प्रत्येक विध्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची कमतरता जाणून त्यांना यशा पर्यंत पोहचविण्याचं कार्य करीत असतात.यावेळी क्लासेसच्या संचालिका,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या