एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेचा निकाल शंभर टक्के

 एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेचा निकाल शंभर टक्के





औसा-- एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत औसा येथील श्री विरभद्रेश्वर प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला. यामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार संस्थाचालकांच्या हस्ते करण्यात आला.  अध्यक्षस्थानी संस्थासचिव सेवानिवृत्त उपप्राचार्य सी. एस. तोडलगे होते. 

     औसा शहरात सन 1997 मधे शिक्षण तज्ञ , ध्येयवेडे व्यक्तीमत्त्व असलेले स्व. शांतवीरप्पा पंचप्पा जळकोटे यांच्या अध्यक्षतेखाली श्री विरभद्रेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री विरभद्रेश्वर प्रशाला या ज्ञानमंदीराची उभारणी करण्यात आली. त्यावेळेपासून आजतागायत शिक्षणात  स्व. जळकोटे यांच्या तत्वाशी एकरूप होऊन विवीध स्पर्धापरीक्षा,  कला, खेळ, योगप्रशिक्षण, संस्कार , स्वयंशिस्त यांसह शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासण्यासाठी कटीबद्द असणारी सामान्य शाळा असामान्य विद्यार्थी घडवण्यात अग्रेसर  असते. या श्री विरभद्रेश्वर प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.  याचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य जी. एस. औटी , संस्था कोषाध्यक्ष युवराज हालकुडे,  सहसचिव शरणप्पा उटगे , मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे मंचावर उपस्थित होते. यावेळी अतिथी म्हणून बोलताना प्रा. हालकुडे यांनी आजच्या काळात शिक्षणासाठी गावाबाहेर पडल्यानंतर कसे वागावे व स्वयंशिस्त कशी अंगी बाळगावे हे विवीध उदाहरणासह विषद केले.याप्रसंगी शाळेतून सर्वाधिक गुण घेतघेली कु. प्रज्ञा बालाजी पोतदार( गुण 96.60), द्वितीय कु. स्नेहा सुनिल चरकपल्ले (गुण 94.20), तृतिय चि. हर्षवर्धन बालाजी वाघमारे (गुण 93.60), कु. आदिती महादेव पवार (गुण 93.20), कु. संस्कृती प्रमोद महामुनी (गुण 93) , कु.  जान्हवी ज्ञानेश्वर सुतार (गुण 92.60) , कु. स्नेहा शिवाजी वैद्य (गुण 91.40) आदीं गुणवंतांचा पालकांसह सत्कार करून पेढे वाटण्यात आले. या सोहळ्याचे सुत्रसंचलन वर्गशिक्षक सदाशिव कांबळे यांनी तर प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख चंद्रशेखर हलमडगे यांनी  केले. शेवटी आभार मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे यांनी मानले. यावेळी शाळेतील सहशिक्षक  शिवाजी वैद्य, श्रीम. अनुराधा लोहारे, श्रीम. अनुराधा पवार, दिगंबर शालगर, बालाजी सोळूंके, दिलीप राठोड आदी शिक्षक=कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या