महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक चा समावेश करणेच्या विचाराधीन असलेल्या राज्य सरकारचा औशात वंचितच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्य सरकार चा निषेध .

 औशात वंचितच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्य सरकारच्या निषेध केला.





 औसा( प्रतिनिधी) औसा तालुका  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले की  महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक चा समावेश करणेच्या विचाराधीन असलेल्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.या पौराणिक ग्रंथाच्या आधारे पुर्वीच्या काळी असलेल्या कायद्यामुळे या देशातील बहुजनांचा अस्तित्व छळ झाला.असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे सदर मनुस्मृती ग्रंथाचे जाहीर दहन केलेले होते. व आजरोजी देशातील संपूर्ण समाज घटकांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व व न्याय देणाऱ्या संविधानाची गरज भारतीय समाजाला असताना महाराष्ट्र राज्याचे सरकार मनुस्मृतीचे कायदे परत आणण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते. आहे. महाराष्ट्र राज्याचे शालये शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर यांनी मनुस्मृतीचे समर्थन केले आहे.

तरी सामाजिक स्वास्थ्य निकोप रहावे या उद्देशाप्रती सरकारच्या मानसिकतेच्या व शालेय शिक्षण मंत्र्याचा औसा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले.तसेच मनुस्मृती शिक्षणात समाविष्ट करण्याचा निर्णय या राज्य सरकारने केला आहे. ते  रद्द करण्यात यावे. जर याची अंमलबजावणी झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने   येणाऱ्या काळात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रभारी महावीर बनसोडे शहराध्यक्ष सद्दाम पठाण कार्याध्यक्ष इलियास चौधरी,सौदागर कांबळे, आयुष कांबळे,मजहर सिद्दिकी,प्रेम बनसोडे, सुरज बनसोडे, सोहेल शेख,विशाल बनसोडे, अँड.जयराज जाधव, मेजोदीन शेख, गणेश सुरेश बनसोडे, प्रदिप कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या