अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्यकारभार प्रेरणादायी- आमदार अभिमन्यू पवार
औसा प्रतिनिधी
औसा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदर्श राज्यकारभार करीत देश धर्म आणि देव रक्षणासाठी केलेले कार्य संपूर्ण मानव जातीला प्रेरणादायी आहे त्यांचे आदर्श न्यायदान तसेच महिला राज्यकर्ते म्हणून बुद्धीच्या चातुर्याच्या बळावर निर्माण केलेला आदर्श आचरणात आणणे आजच्या पिढीला गरजेचे आहे महापुरुषांच्या आदर्शाचे अनुकरण करून आपल्या जीवनाचे वाटचाल होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. येथील अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहामध्ये ध्वजारोहण प्रतिमा पूजन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख होते, व्यासपीठावर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, भाजपा शहराध्यक्ष सुनील उटगे,माजी नगरसेवक बंडू कोद्रे, आणि गोविंद जाधव, हनुमंत राजट्टे ,विकास नरहरे, इमरान सय्यद, प्रदीप मोरे, गोपाळ धानोरे, अशोक कुंभार, राजेंद्र बनसोडे, बाळू सोनवळकर, युवराज चव्हाण, लिंबराज जाधव, सचिन माळी, धनगर समाजाचे अध्यक्ष हनुमंत कांबळे, जयंती समितीचे अध्यक्ष नागेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व विविध समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होळकर चौकामध्ये ध्वजारोहण करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यांनी धनगरी गजा ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सर्वश्री सुभाष आप्पा मुक्ता, हनुमंत राजट्टे आणि डॉक्टर अफसर शेख यांनी शुभेच्छा वर मनोगत व्यक्त केले राम कांबळे यांनी प्रास्ताविकातून जयंती महोत्सवाची माहिती विशद केली. सायंकाळी पाच वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिनिधीची भव्य मिरवणूक काढून येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भंडाराची उधळण करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. होळकर प्रतिष्ठान औसा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.