मयत वडीलांच्या नावे असलेल्या कर्जफेडीसाठी अदा केलेली रक्कम जमा न केल्याचा मुलाचा आरोप.
जिल्हाधिकारी यांना निवेदन.
शेख बी जी.
औसा.दि.1 तालुक्यातील भादा येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या कारभारावर प्रथमच आरोप करण्यात आले आहेत. प्रदीप प्रभू उबाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की माझ्या वडिलांच्या नावे 257878 रुपये असलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी उसबिलातुन प्रदीप यांनी 53000 व वामन उबाळे 45000 रुपयांची तर आनंद उबाळे 45000 रुपये दिले गेले तसेच भरत उबाळे यांनी 90000 रुपयांची स्लिप मधुन पैसे उचलले गेले मात्र त्याचा भरना संबंधित सचिव व चेअरमन यांच्याकडून झाला नाही.असे आरोप केले आहेत
वारंवार विचारणा करून देखील ते हे काम करत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले आहे.
पण या सर्व आरोपांना चेअरमन दत्तकुमार शिंदे यांनी नाकारले आहे."राजकीय द्वेषापोटी काही नेते मंडळी हे षडयंत्र करत आहेत.संबंधित व्यक्तीने स्वतः पैसे उचलले आहेत. कुटुंबातील काही रक्कम जमा न झाल्यामुळे भरना झाला नाही.दोन दिवसात सर्व प्रकार समोर येईल.जे आम्हाला नाव ठेवत आहेत तेच सगळं सत्य मांडतील.अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.बदनामी करण्याऐवजी सत्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे."
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.