राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाळा - महाविद्यालयात व्याख्याने आयोजित करावीत : राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

 राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त शाळा - महाविद्यालयात व्याख्याने आयोजित करावीत 

:  राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन 






लातूर : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त सर्व शाळा - महाविद्यालयातील नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर व्याख्याने आयोजित करावीत, अशा मागणीचे  निवेदन फुले -शाहू -आंबेडकर विचार मंच अंतर्गत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती लातूरच्या शिष्टमंडळाने आज 24 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती 26 जून रोजी महाराष्ट्रसह सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येते. केवळ यामुळे त्यांच्या सामाजिक सुधारणाच्या विचारांना उजाळा मिळत नाही. म्हणून प्रत्येक शाळा, महाविद्यालयात 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी विचारसभा अर्थात व्याख्यानांचे आयोजन केल्यास शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा इतिहास उलगडला जाईल. आजच्या पीढिला शाहू महाराज कळतील. सदर व्याख्यानांना सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांला निमंत्रित करावे. याबाबतचे शिक्षण उपसंचालकांनी पत्रक काढून शाळा - महाविद्यालयाना तसें कळवण्यात यावे, अशी मागणी सदरच्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. माधव गादेकर, सचिव राजकुमार होळीकर, प्रा. सुधीर अनवले, प्रकाश घादगीने, ऍड. शिरीष दहिवाल, कॉ. विश्वभर भोसले, टी. एस. माने, पी. जी. भिसे, मुझमील शेख,संजय कुंटेवाड, प्रा. बबन पवार, गणपत तेलंग, रामराव गवळी, गणपतराव पाटील, शेख शफी, आर. डी. गायकवाड, श्रावण मस्के आदीचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या