ऐकाल ते नवलच
सरपंच उपसरपंचाच्या वस्तीतील शाळेत जनावरांचा गोठा .
शेख बी जी.
औसा.दि.21 तालुक्यातील भादा हे लोकसंख्येने मोठे असलेले गाव. या गावात तीन जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. पैकी दोन शाळांमध्ये विद्यार्थी संख्या दिसून येते. तर एका शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अभावी शाळा बंद झाल्याचे चित्र आहे. ही शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कसलाही प्रयत्न न केल्यामुळे या शाळेत विद्यार्थी नाहीत, तर चक्क जनावरे राहत असल्याचे चित्र आहे.
भादा येथील शिंदेवाडी ही वस्ती 30 ते 35 कुटुंबाची वस्ती आहे. येथे जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंत भरत होती. परंतु स्थानिक नेत्यांच्या उदाससिनेतेमुळे विद्यार्थ्यांच्या संख्या अभावी काही वर्षांपूर्वी बंद पडली बंद झालेल्या या शाळेला पुनश्च चांगले स्वरूप देण्यासाठी कसल्याच प्रकारचा प्रयत्न झाला नाही. बंद पडलेल्या या शाळेमध्ये हळूहळू जनावरांचा वावर वाढू लागला. येथील काही लोकांनी शाळा भरत नाही हे निश्चित झाल्यानंतर उन्हाळ्यात व पावसाळ्यात आपल्या जनावरांना आडोसा मिळावा म्हणून येथील रिकाम्या असलेल्या खोल्यांमध्ये जनावरे बांधण्यास सुरुवात झाली व एकूणच घाणीचे स्वरूप निर्माण झाले.
विशेष म्हणजे या वस्तीमध्ये भादा गावचे सरपंच, उपसरपंच,चेअरमन व पंचायत समिती सदस्य राहतात कोणालाही याची तमा नसल्याचे दिसून येते.
आजही पुन्हा तेच स्वरूप यावे असे येथील अनेक नागरिकांना वाटते. परंतु स्थानिक नेत्यांनी या कडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सरपंच मीना दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे, चेअरमन दत्तकुमार शिंदे, तर पंचायत समिती सदस्य शिवकुमार शिंदे यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुनश्च शाळेला शाळे सारखे स्वरूप दिल्यास पूर्वीचे दिवस येतील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.