सर्वोच्च न्यायालयात 29 जुलैपासून विशेष लोकअदालत
लातूर,दि.19(जिमाका)- सर्वोच्च न्यायालय येथे 29 जुलै 2024 ते 03 ऑगस्ट 2024 या कालावधीत विशेष लोक न्यायलयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवली जाणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील पक्षकारांची जी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांना या विशेष लोकन्यायालयाचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकरणात ज्या पक्षकारांना तडजोड करावयाची आहे, त्यांनी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संपर्क करावा. तसेच तडजोडीपूर्व बैठकीची सुविधाही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे प्रत्यक्ष व अभासी पध्दतीने केलेली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही. व्ही.पाटील यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आयोजित केलेल्या लोक न्यायालयामध्ये सहभाग घेऊन पक्षकारांनी तडजोडीव्दारे प्रकरण निकाली केल्यास त्यांचा वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे. तरी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा. या लोक न्यायालयातील प्रकरणांमध्ये तडजोडीपूर्व बैठकीची व्यवस्था वैकल्पिक वाद निवारण इमारत, जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे केल्याची माहिती लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी. केस्तीकर यांनी दिली आहे.
**
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.