अनाधिकृत होर्डिंगधारकांसह मालमत्ताधारकांवर
मनपा कार्यवाही करणार.
लातूर/प्रतिनिधी: घाटकोपर मुंबई येथे सोसाटयाचा वारा व वादळामुळे होर्डिंग कोसळुन अपघात होऊन जिवित हानी झालेली आहे. व नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील महादेववाडी पाटीनजीक येथील दिशा व अंतर दर्शविणारा फलक कोसळुन अपघात होऊन जिवित व वित्त हानी झालेली आहे.
त्याअनुषंगाने लातूर शहरातील ज्या खाजगी मालमत्तांवर अनधिकृत होर्डींग्ज लावण्यात आलेले आहेत, सदर होर्डींग्ज हे संपूर्ण स्ट्रक्चरसहीत तात्काळ काढून घेणेसाठी नोटीस देवून मुदत देण्यात आली होती. तथापि अदयापही बरेच होर्डींग्ज न काढल्याचे निदर्शनास येत आहे. तरी सदर होर्डींग्ज हे निदर्शनास आल्यास सदर मालमत्ताधारकांवर व एजन्सीधारकांवर क्षेञिय अधिकारी यांच्यामार्फत गुन्हा नोंद करण्याची सक्त कार्यवाही करण्याचे आदेश मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिलेले आहेत. तरी ज्या खाजगी ईमारतीवर अनधिकृत होर्डींग्ज आहेत, त्या तात्काळ काढून घेवून मनपास सहकार्य करावे. सदरील होर्डींग्जमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात झाल्यास सदर मालमत्ता धारकांवर व एजन्सीधारकांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच मनपा मार्फत काढण्यात आलेल्या होर्डींग्जसचा खर्च मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यात येईल. तसेच मनपाने परवानगी दिलेल्या युनिपोलवरील जाहिरात बॅनर्स बंद करुन वादळी वारे व वादळी पाऊसच्या संभाव्य शक्यतेमुळे फ्लेक्सी व इतर साहित्य काढून मोकळे ठेवणे बाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.