*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गुटखा व मुद्देमाल जप्त*
स्थानिक गुन्हे शाखा लातूर कडून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई करून 14 लाख किमतीचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैद्य धंद्याबाबत माहिती काढत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लातूर शहरातील शाहू चौक कडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे एका वाहनांमध्ये काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहनातून घेऊन जाणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 27/06/ 2024 रोजी अण्णाभाऊ साठे चौक लातूर येथे सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास न्यू प्रेम किराणा अँड जनरल स्टोअर दुकाना समोरून ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 4 लाख 51 हजार 200 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कंपनीची गाडी असा एकूण 14 लाख 51 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे 1) व्यंकटेश चंदन कोमटवाड,वय 24 वर्ष, राहणार शाहू चौक ज्ञानेश्वर नगर लातूर, .
2) विशाल शिवाजीराव चव्हाण,वय 37 वर्ष,राहणार मुरंबी ता.चाकूर, लातूर.
3) तानाजी बालाजी खताळ,वय 32 वर्ष,राहणार बादाडे नगर तावरजा कॉलनी, लातूर.
4) प्रेम तुकाराम मोरे,राहणार साळी गल्ली शाहू चौक हनुमान मंदिरासमोर, लातूर. इनोव्हा गाडी मालक आहे.
सदरची कामगिरी मा श्री सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर, डॉ. अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक लातूर मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, साहेबराव हाके, मनोज खोसे,राहुल कांबळे सर्व नेमणूक स्थानी गुन्हे शाखा लातूर यांनी पार पाडली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.