दापेगाव च्या युवकाने मिळवला कोल्हापुरात जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
शेख बी जी.
औसा.दि.२६ तालुक्यातील मोजे दापेगाव येथील युवकाने कोल्हापूर जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळवल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
बाळेघोल ता.कागल ग्रामपंचायतीचे कार्यक्षम ग्रामसेवक अविनाश वाघे (लातूर) याना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या यावर्षीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते त्याना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वाघे यांनी बाळेघोलवासियांसाठी पंचायत पातळीवर विविध योजना राबवल्या.गावाला यशवंत ग्रामपंचायत, आदर्श सरपंच, उत्कृष्ट आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार,आर.आर. पाटील स्वच्छ ग्रामपंचायत, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजना राबविण्यात जिल्ह्यात बाळेघोल ग्रामपंचायत प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गावाला जलजीवन योजना राबवली,लोकसहभागातून अनेक योजना लोकांच्या दारी पोहचविल्या,शंभर टक्के करवसुली केली.घरकुल योजना यशस्वी पणे राबवली. सरकारच्या योजना ग्रामस्थांपर्यत पोहचविण्यासाठी कागदपत्राची तत्परतेने पुर्तता केली. पंचायत दप्तर मध्ये पारदर्शकता ठेवली.तळागाळातील लोकांच्यासाठी वेगाने योजना राबवून ग्रामस्थांमध्ये आदर्श निर्माण केला.या सर्व कामकाजाची दखल घेत जि.प.त्याना या पुरस्काराने गौरव केला .
ग्रामसेवक पदावर नियुक्त होण्याआधी ते औसा शहरात असलेल्या गुरुकुल अध्यापक विद्यालयात अध्यापनाचे कार्य करत होते.त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्रासह परिवारात कौतुक केले जात आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.