लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरचा १०० टक्के निकाल
लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या औषधशास्त्र पदविका उन्हाळी परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२३- २४ प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून ,श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयातील प्रथम वर्षातून प्रथम क्र अमाने गायत्री ८३.१० टक्के,द्वितीय क्र पवार जयपाल ८१.८० टक्के,तृतीय क्रमांक वायचल अनिकेत ८१.३० तसेच द्वितीय वर्षातून प्रथम क्रमांक मुंडे मीरा ८३.५५ टक्के, द्वितीय क्रमांक रेड्डी वैष्णवी ८०.५५ टक्के, तृतीय क्रमांक सोळुंके तनुजा ८०. ०९ टक्के घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य श्रीनिवास बुमरेला प्रा.अतुल कदम, प्रा. शबनम शेख, प्रा. शुभम वैरागकर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.