झाडांचा वाढदिवस साजरा करत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान
-श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा अनोखा उपक्रम
लातूर
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजस्थान विद्यालय व राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा पाठीमागे उजाड असलेल्या परिसरात गेल्या पाच वर्षांपूर्वी लावलेल्या आणि वाढविलेल्या झाडांचा वाढदिवस मंगळवारी सकाळी प्रमुख मान्य वरांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला व समाजातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यास्त आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी तर वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गीते, वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरिधारी, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, संस्थेचे सचिव अॅड.आशिष बाजपाई, संस्थेचे सदस्य कमलकिशोर अग्रवाल, श्यामसुंदर खटोड, शांतीलाल कुचेरिया, आशिष अग्रवाल, किशोर भराडिया, चैतन्य भार्गव, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, डॉ. ओमप्रकाश भोसले, डॉ.संजयकुमार शिवपूजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वाढत्या प्रदूषणाचे धोके आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन, नागरिकांना व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्यात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थचे सचिव अॅड.आशिष बाजपाई यांच्या संकल्पनेतून शाळेच्या साडे सात एकर परिसरात विविध प्रकारच्या प्रजातींच्या सुमारे ५००० पेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला गेला. या झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची जवाबदारी संस्थांतर्गत राजस्थान विद्यालय, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, श्री गोदावरीदेवी लाहोटी विद्यालय, पुरणमल लाहोटी पाठशाळा, केशरबाई भार्गव विद्यालय, सुरजकुंवरदेवी क्रियेटीव्ह किड्स या शाळांना दिली होती. संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थ्यांनी या झाडांच्या संवर्धनासाठी परिश्रम घेऊन सर्व झाडे जगवली. परिसरात फुलझाडे, फळझाडे आणि वेलवर्गीय वनस्पती फुलल्या आहेत. यामुळे या परिसराला झळाळी मिळाली आहे. यामुळे मोठ्याप्रमाणावर प्राणवायूची निर्मिती होत आहे आणि दुर्मिळ होत असलेल्या विविध पक्षांची रेलचेल दिसून येत आहे.. उजाड रानाचे हिरवाईने नटलेले रूप पाहून स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही वृक्ष लागवड चळवळ गतिमान व्हावी व समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये रुजावी म्हणून दरवर्षी संस्थेच्यावतीने झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मिलिंद गिरिधारी म्हणाले की राजस्थान शिक्षण संस्थेद्वारा वृक्ष लागवड करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देत निसर्ग प्रेमी व पर्यावरणस्नेही पिढी निर्माण करण्याचा अनोखा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारावा. झाडे तोडणाऱ्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.