सरोळा रोडच्या गटारीचे काम वस्तीतील गटारीचे घाण पाणी जाईल असे करावे.
बांधकाम विभागास निवेदन.
शेख बी जी.
औसा.दि.11 हद्दीतील सारोळा रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या गटारीचे काम प्रस्तावित करण्यात आलेले असून गटारीचा उतार व उंची तसेच खोली ही नजीकच्या वस्तीतील जुन्या गटारीचे सांडपाणी त्यामध्ये जाईल याप्रमाणे करणे आवश्यक आहे. जेणेकरून नजीकच्या वस्तीतील गटारीतील सांडपाण्याची विल्हेवाट ही योग्यरीत्या लागेल. तसेच नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येणार नाही. अशा आशयाचे निवेदन येथील माजी नगराध्यक्ष शेख जावेद यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिले आहे.
विद्यमान स्थितीत सदरील गटारी नसल्याने जागोजागी गटारीचे पाणी तसेच रस्त्यावरील पाणी साचून मच्छरांची मोठ्या प्रमाणात पैदास व डेंग्यू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. या भागात एन ए झालेला असल्यामुळे नाली सेंटर पासून नऊ मीटरवर करण्यात यावी अशा आशयाची निवेदन देण्यात आले आहे.या ठिकाणी हाश्मी चौक ते सारोळा रोड कडे जाणारा एक किलोमीटरचा सिमेंट रस्ता हा बोगस झालेला असून जागोजागी रस्ता उघडलेला आहे.तरी हा सिमेंट रस्ता दुरुस्त करून द्यावा व हा झालेला रस्ता अत्यंत घाई घाई व कुठलेही खोदकाम न करता झालेला असून त्याचे व्हिडिओ,फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. तरी त्या प्रकरणी दुर्लक्ष झाल्यास जन आंदोलन उभारण्यात येईल व प्रसंगी न्यायालयाकडेही जनहितार्थ दाद मागण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर स्थानिक नागरिकासह माजी नगराध्यक्ष अफसर शेख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.