पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत असल्याने उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा.

 पाणी पुरवठा करण्यास अडथळा येत असल्याने उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा.






शेख बी जी.


औसा.दि.12 शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी नेहमी विद्युत खंडित होत असल्याने  येथील  माजी नगरसेवक जावेद शेख यांनी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार येथील उपविभागीय अभियंता यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित करावा यासाठी निवेदनाद्वारे इशारा दिला.

    शहरास माकणी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.माकणी धरणातील पाणी आलमला रोड वर असलेल्या फिल्टर ला येऊन शुद्धीकरण करून शहरातील जलकुंभास येतो.मागील एक महिन्यापासून सदरील दोन्ही ठिकाणी सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरास पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. हा नेहमीचा त्रास औसेकरांना होत असल्याने नागरिकास मानसिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.म्हणून उपअभियंता यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येई. अशा प्रकारचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर येथील अविनाश टिके,आखलाख पटेल,समीर पठाण,माजी नगराध्यक्ष अफसर शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या