प्रभागातील ठिकठिकाणी मुरूम टाकून नाली साफ करण्याची केली मागणी .
माजी नगरसेवक जावेद शेख यांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन.
शेख बी जी.
औसा.दि.13 सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शहरातील नवीन हद्दवाढीतील वेगवेगळ्या प्रभागात पावसाचे पाणी थांबून रस्ते पाण्याने भरल्याचे चित्र दिसून येत आहे. पाऊस पडल्यानंतर चलणे फिरणे कठीण होत आहे. याकडे समस्येकडे लक्ष देऊन ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत अशा ठिकाणी मुरूम टाकून देण्याची मागणी माजी नगरसेवक जावेद शेख यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून निवेदनाद्वारे केली आहे.या मागणी सोबतच काही भागांमध्ये दोन ते तीन वर्षापूर्वी नाली बांधकाम झालेले असून अद्याप पर्यंत नाली सफाई चे काम झाले नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. म्हणून नाली सफाई करून नागरिकांच्या आरोग्याचे होणारे नुकसान टाळावे असेही निवेदनात म्हटले आहे.हाश्मी नगर, नबी नगर, बरकत नगर, अन्सार नगर,के के नगर एच पी नगर व महाराष्ट्र बेकरी जवळील भागात मुरूम टाकणे अत्यंत आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. थोडासा पाऊस पडला तरी या भागात पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आदमखान पठाण, माजी नगराध्यक्ष शेख जावेद,जमीर खान पठाण, अखलाख पटेल, समीर शेख, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.