उमरा ला जाणाऱ्या यात्रेकरूसाठी औसा येथे प्रशिक्षण शिबीर.
औसा प्रतिनिधी एम बी मणियार
औसा येथील उमरा जाणाऱ्या भाविकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने आज दिनांक 14 जूलै 2024 रविवार रोजी दुपारी अडीच वाजता हाशमी फॅकशंन हाल येथे हाफीज फैज ईशाअती व मौलाना इरफान सौदागर साहब,व तसेच मौलाना कासीम साहब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.या शिबिरामध्ये हाफीज फैज ईशाअती यांनी असे सांगितले उमरा जाणाऱ्या भाविकांसाठी चार गोष्टी केल्या पाहिजेत.त्यामध्ये प्रथम एहराम घालणे,दुसरे तवाफ करणे,तिसरे सफा मरवा करणे यांनी मक्का चे सात चक्कर लावणे,चौथे तलबीया पठण करणे हे चार काम उमरामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे.उमरासाठी जाणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त वेळ तवाफ व इतर अल्लाहच्या इबादत मध्ये जास्त वेळ लावा. अल्लाह कडे मन लावायचे प्रार्थना करावी.शक्यतो मोबाईल टाळावा,घराशी संपर्कात जास्त वेळ घालवू नये. मौलाना इरफान यांनी मक्का आणि मदिना येथे आवश्यक अहेकाम पूर्ण केले पाहिजे.आणि उमरा च्या महत्वाच्या मुद्यावर सविस्तर प्रकाश टाकला.शेवटी मौलाना कासीम साहब यांनी उमराला जाणाऱ्या भाविकांसाठी अल्लाह कडे दुवा मागितली.यावेळी प्रशिक्षण शिबीरात उमरा साठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रवासी पिशव्या व हॅडबॅगचे वाटप करण्यात आले.यावेळीबासीद शेख, अद्दुआ टुर्स चे अहेमद साहब आणि उमरा जाणाऱ्या यात्रेकरू उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.