राष्ट्रवादीच्या औसा तालुका उपाध्यक्षपदी जानीमियाँ शेख यांची निवड
औसा, (प्रतिनिधी)
औसा शहरातील शरदचंद्र पवार याचें हाडांचे निष्ठावंत कार्यकर्ते जानीमियाँ शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या औसा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शेख रशीद. युवक जिल्हा अध्यक्ष भरत सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष शामराव साळुंके शहराध्यक्ष सनाऊल्ला शेख यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. औसा तालुक्यात शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीचे विचार घराघरात पोहोचता कराल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूका विचारात घेता जानिमीयाँ शेख यांचा औसा तालुक्यात जनसंपर्क असल्याने याचा फायदा निश्चितपणे पक्षाला फायद्याचे ठरेल.
प्रमाणिकपणे काम करणार
जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला औसा तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्यामुळे मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो. मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. माझ्यासोबतच्या अनेकांनी अनेक पक्ष बदलले पण मी प्रामाणिकपणाने पवार साहेबच्या सोबत राहिलो आहे. जिल्हाध्यक्षांनी मला मोठी जबाबदारी दिल्यामुळे मी औसा तालुक्यातील सामान्य नागरिकाचे अडीअडचण तसेच पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करण्याचे काम प्रमाणिकपणे करणार असल्याची माहिती नूतन तालुका उपाध्यक्ष जानिमीयाँ शेख यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याचें भान आणि जाण ठेवून मी काम करेन. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची उकल व्हावी म्हणून मी सदैव अग्रेसिव राहीन मी माझ्या कार्यातून शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिष्टा वाढेल असेच काम करेन असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.