विशालगड व गजापूर गावामध्ये मस्जिद व मुस्लीम लोकांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे समस्त मुस्लिम बांधवांनी दिले निवेदन.
शेख बी जी.
औसा.दि.19 समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने 14 जुलै 2024 रोजी विशालगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्वळ असलेल्या दर्गाह, मस्जीदवर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर भ्याड हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये दर्गाह मस्जिदीचे तसेच मुस्लीम लोकांच्या घराचे व दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. या भ्याड कृती करणाऱ्या हल्लेखोरांचा आम्ही सर्वप्रथम तिव्र निषेध करतो व ही कृती करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांचा धिक्कार करतो. विशालगड वरील बेकायदेशीर अतिक्रमण व इतर चुकीच्या गोष्टींचा मुस्लिम समाजाचा कांहीही संबंध नाही.
विशालगड येथील हजरत मलीक रेहान दर्गा ही सर्व धर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे, येथील हजरत मलीक रेहान दर्गाहवर हिंदू, मुस्लीम भाविकांची निस्सीम भक्ती आहे. येथील दर्गाह ही हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. गडावरील कांही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबीत असताना आणि ते काढण्याबाबत मा. न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी, रविंद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादीय तरुणांनी एकत्र येऊन विशालगडावरील पवित्र दर्गाहवर दगडफेक केले हे वाईट कृत्य करुनदेखील गप्प न राहता दंगेखोरांनी विशालगडावरुन परतताना गडाशेजारील गजापुर या गावातील मस्जीद तसेच मुरलीम लोकांवर आणि त्यांच्या घरावर, दुकानावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लीम लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचे न भरुन येणारे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. हे कृत्य अंत्यंत निदनिय व बेकायदेशीर आहे. यामुळे महाराष्ट्रातील फक्त मुस्लीमच
नाही तर हजरत मलीक रेहान बाबांच्या भक्ती असलेल्या सर्व भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
यापुर्वीही पवित्र दर्गाहवर छोट्या तोफ सदृश्य यंत्राने फटाक्याचा बॉम
फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कांही जातीयवादी तरुणांनी केला होता. गेल्या रविवार ची दुर्दैवी घटना घडल्यापुर्वी साधारण आठ दिवसापुर्वी म्हणजेच दि. 08 जुलै 2024 रोजी माजी आमदार नितीश शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली विशालगडवर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीदेखील त्यांच्या उपस्थितीत लोकांना तेथील दर्गा, इस्लाम धर्म तसेच गडावरील स्थानिक रहिवाश्यांच्या विरुध्द भडकाऊ भाषण देऊन एक प्रकारची चिथावणी देण्याचे काम करण्यात आले होते. जातीयवादी हल्लेखोरांना अशा चिथावणीमुळेच हल्ले करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे माजी आमदार नितीश शिंदे यांना या हल्ल्याचा जबाबदार धरुन त्यांच्यावर देखील कायदेशीर कार्यवाही करावी. यापुर्वी दर्गाह येथे झालेला हल्ला महाआरती माजी खासदार छ. संभाजी यांनी त्यांच्या समर्थकांना 14 जुलै 2024 रोजी विशालगडवर येण्याचे केलेले आवाहन यामुळे विशालगड आणि परिसरात जातीयवादी लोकांकडून अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो याची पुर्वकल्पना असतानादेखील कोल्हापुर पोलीस दलाने अत्यंत निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळल्यामुळे हा पुर्वनियोजीत हल्ला घडला आहे. यामुळे या निष्काळजीपणा ला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे.
दि. 14 जुलै 2024 रोजी स्वराज्य संघटना, हिंदु राष्ट्र सेना या संघटनांनी विशालगडवरील अतिक्रमण विरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरी सुध्दा मुळशी, मावळ पुणे, सातारा, कोल्हापूर वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला गेला व जमावाला भडकावण्याचे काम सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले गेले. आलेल्या जमावाने विशालगडावर तसेच विशालगडापासुन 3 कि. मी. अंतरावर आलेल्या गजापूर गावात मुस्लीम समुदायाची घरे जाळणे, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांवर जिवघेणा हल्ला करून जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, स्त्रियां व लहान मुलांवर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जिवघेणा हल्ला करणे, स्थानिक रहिवाशी असलेल्याच्या घरातील मौल्यवान दागीने व वस्तु चोरणे, जबरदस्ती घरात घुसुन तोडफोड करणे, मुस्लीम समाजाचे प्रार्थना स्थळ आणि मस्जीद याची तोडफोड करुन धार्मिक भावना दुखवणे या सारखे गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेले आहे.
सदर घटना पुर्वनियोजीत असून वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटकक रुन कठोरात कठोर शिक्षा करावी.
मोर्चाचे आयोजन करणाऱ्या स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे व इतर पदाधिकारी पुण्यातील रविंद्र पडवळ, अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हिंदु राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना ताबडतोब अटक करावी.
झालेल्या हिंसाचारात ज्यांची आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी जी शेकडो वर्षापासुन प्रार्थनास्थळे आहेत त्यांना संरक्षणाची व्यवस्था प्रशासनाने करावी.
मुस्लीम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सतत होणाऱ्या अत्याचारा विरोधात पोलीस अधिक्षक त्यांच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तीची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी.
सोशल मिडीयात मुस्लीम समाज व त्यांच्या आस्थेशी जुळलेल्या धार्मिक स्थळांबाबत व्हि.डी.ओ. बनविणाऱ्यांना आणि धार्मिक भावना दुखवणाऱ्या मंडळीवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी.अशा अशयाचे निवेदन औसा येथील तहसीलदार यांना देण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.