औसा पालिकेचे नवे गाळे
घाणीच्या विळाख्यात.
शेख बी जी.
औसा.दि.१० शहरातील तहसील कार्यालयाजवळ औसापालिकेने बांधलेल्या नवीन गाळयांना घाणीने ग्रासले आहे. सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला मोठ्या हौसेने राष्ट्रवादी ची सत्ता असताना बांधले होते. या गाळ्यांचा लिलाव तितकाच वादातीत ठरला होता. मोठे हौसेने बांधलेल्या या गाळ्यांना सद्यस्थितीमध्ये घाणीने विळखा घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
"हौसेने केला पती व त्याला फुटली रगत पिती" अशी स्थिती या गाळ्याकडे पाहून दिसून येते.
जवळच सांस्कृतिक सभागृहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असतात. या कार्यक्रमामधून पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास उरलेले अन्न या ठिकाणी टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. लिलावात अनेकांनी हिरीरीने सहभाग घेतला मात्र या ठिकाणी मोजक्याच लोकांनी आपले दुकान थाटले आहे. वर्दळ नसल्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या नागरिकांकडून घाण केली जात असल्याचे समजते. या ठिकाणी काही गाळयांमध्ये तर टॉयलेट केल्याचे दिसून आले.
पालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते. तात्काळ या ठिकाणची घाण दूर करून स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या ठिकाणचे गाळेधारक करत आहेत.
पालिका प्रशासनाला कोणी वाली उरला नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याची नागरिकात चर्चा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.