*डॉ.शेख आर.आर.सेवा पुरस्काराने सन्मानित.
लातूर (प्रतिनिधी) कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याची तथा सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ.शेख आर.आर.यांचा सोशल एज्युकेशन अँड वेलफेयर असोसिएशन (सेवा) यवतमाळ यांच्या वतीने रविवार,28 जुलै 2024 रोजी रॉयल पॅलेस हॉल,हैदराबाद रोड,यवतमाळ येथे खासदार श्री.संजयजी देशमुख यांच्या उपस्थितीत सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी श्री.भाई अमन सामाजिक कार्यकर्ते,यवतमाळ, श्री.रियाझ अहमद अध्यक्ष,सेवा,यवतमाळ उपस्थित होते.
सोशल एज्युकेशन अँड वेलफेयर असोसिएशन (सेवा) यवतमाळ या प्रणालीचा उद्देश विविध तळागाळातील उपक्रम राबविणे,घरोघरी भेटी,पथसंचलन आणि इल्मी जमात याद्वारे समाजात शैक्षणिक जागृती निर्माण करणे.शैक्षणिक मागास गरीब,मजूर आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वांना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल प्रोत्साहन देणे.स्पर्धा परीक्षा,वैद्यकीय,अभियांत्रिकी आणि एकसमान नागरी सेवा वर्गांद्वारे तयारी करणे असे अनेक उद्देश घेऊन सेवा संस्था कार्य करीत असते. यावर्षी डॉ.शेख आर.आर.यांना संपूर्ण औसा तालूक्यात केलेल्या कोरोना काळातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.शेख आर.आर.यांचे सर्व मित्र परिवार, नातेवाईक आणि सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.