क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कारासाठी

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन





लातूरदि. 03 ) : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर किमान दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. सन 2023-24 वर्षासाठी या पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षक व शिक्षिका यांनी https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAiu7  या लिंकवर आपली नोंदणी करून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये एक माध्यमिकएक प्राथमिक शिक्षकएक गाईड शिक्षकएक स्काऊट शिक्षक तसेच विभागातून एक आदर्श शिक्षिका पुरस्कार व राज्यस्तरावरून एक कला शिक्षकएक क्रीडा शिक्षक व एक दिव्यांग शिक्षक अशा शिक्षकांची शिक्षक पुरस्कारासाठी निवडी केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या पुरस्कारासाठी नोंदणी करावी, असे आवाहन लातूर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागेश मापारी यांनी केले आहे.

*****




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या