वृद्ध साहित्यीक कलावंताच्या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा
औसा/प्रतिनिधी
१६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने छञपती राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक व कलावंत योजनेतील मानधन निवड समितीची पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अनायकारक असल्यामुळे अखिल भारतीय वारकरी मंडळ औसा तालुका शाखा यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. वृद्ध साहित्यीक कलावंताच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत. जिल्हास्तरीय निवड संमितीमध्ये दोन वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी नेमण्या ऐवजी लोकशाहीमध्ये पदाधिकारी यांना महत्वाचे स्थान असल्यामुळे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती अनुभवी वृध्द कलावंता मधून करण्यात यावी व सर्व अधिकार पुर्वी प्रमाणेच एकाच विभागाकडे अथवा समितीकडे असावेत. संमितीचा कार्यकाल पुर्वीसारखाच असावा. लाभार्थी निवड ही वेगवेगळ्या कलावंताच्या गटप्रकारांच्या लक्षांकात ठेवल्याने इतर कलाप्रकाराचे कलावंतावर अन्याय होऊन नाराजी निर्माण होणार आहे तरी पुर्वीसारखा
सर्वसमावेशक लक्षांक ठेवण्यात यावा गटप्रकार / टक्केवारी रद्द करण्यात यावी., लाभार्थी इष्टांक हा १०० ऐवजी प्रतिवर्षासाठी प्रतिजिल्हा २०० कलावंत निवड करणेसाठी ठेवण्यात यावा., एखादा कलाकार मृत पावल्यास सदर
कलाकार मृत पावल्यास सदर कुटंब पुर्णतः दुखात पुर्ण वर्षभर असते त्यामुळे वारसा प्रस्ताव सादर करणेची ०६ महिण्याची अट रद्द करण्यात यावी व सदर वारस पडताळणी ही जिल्हा परिषदकडेच पुर्वीप्रमाणेच असावी., दिव्यांग कलाकारासाठी पुर्वीच्या शासन निर्णयामध्ये वयाची अट शिथील करण्यात आलेली असून या शासन निर्णयामध्ये वयाची अट शिथील करण्यात यावी., तसेच विधवा / परितक्त्या/आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे / नैसर्गिक अपत्तीगृस्त कुटुंबे यांना प्राधान्य असावे.
दिनांक 16 मार्च 2024 रोजी लादण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे पूर्णतः वारकरी सांप्रदाय मोडकळीस येणार आहे त्यामुळे सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करणे अनिवार्य आहे अन्यथा औसा तालुक्यातील सर्व वारकरी तहसील कार्यालय येथे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये बेमुदत धरणे आंदोलनास बसतील असा इशारा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार औसा व गटविकास अधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष ह.भ.प.खंडु लटुरे महाराज, सिद्रामप्पा राचट्टे, आत्माराम मिरकले,सौ.रंजना खुरपे,दिनकर यडुळे,व्यंकट पवार, गोविंद तावसे यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.