शालेय पोषण आहार पुरवठा हा निकृष्ट दर्जाचा- प्रहार जनशक्ती पक्षाची तक्रार
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील
मौजे मातोळा येथील जि.प. कन्या शाळा मातोळा येथील अतिशय निकृष्ट दर्जाचे शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जात आहे. संपूर्ण औसा तालुक्यात अशा बऱ्याच जि.प. शाळेत पोषण आहार हा निकृष्ट स्वरुपाचा दिला जातो. तसेच केंद्रीय जि.प.शाळा मातोळा येथे ही ह्याच प्रकारचा पोषण आहार आढळून आला,
तरी गटविकास अधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष औसाच्या वतीने
तीव्रआंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.यावेळी या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय आनंदगावकर, तालुका उपाध्यक्ष सहदेव घोडके, अपंग क्रांती तालुका अध्यक्ष ओम हजारे, अविनाश जाधव,ज्योतीराम टेंकाळे, श्याम गोरे, तालुका संघटक अंबादास शेळके, लक्ष्मण राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.