देवणीच्या मुजोर निगरगट्ट बिडीओला निलंबित करा.
गटविकास अधिकारी किरण कोळपेला भ्रष्टाचाराची लागण
देवणी प्रतिनिधी: मौजे वलांडी येथे निलंगा उदगीर राज्य मार्गावर सर्वे नंबर 91/2 मध्ये G+3 चार मजलीचे अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकाम होत असल्याची तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने दिल्याने त्या तक्रारीची दखल शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी घेऊन गटविकास अधिकारी किरण कोळपे यांना सदर प्रकरणात आदेश दिले की मौजे वलांडी गावातील सर्वे नंबर 91/2 मध्ये सुधिर नंदकिशोर टवाणी मालमत्ता क्रमांक 2057, काशिनाथ धुळाप्पा माडगुळे मालमत्ता क्रमांक 2061, दीक्षा दिनकर बिरादार मालमत्ता क्रमांक 2060 या जमिनीवर बांधकाम करण्यात आलेले व चालू असलेले अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकामा बाबत तक्रारीत नमूद बाबीच्या अनुषंगाने स्थानिक चौकशी करून अनाधिकृत बांधकाम होत असल्याचे आढळून आल्यास सदरील बांधकामा बाबत जिल्हाधिकारी लातूर यांचे पत्र जा.क्र. 2022/ महसूल/जमा-1/ डेस्क-1/कावी-1266 दि.20/05/2022 अन्वये नियमानुसार कार्यवाही करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व उपविभागीय कार्यालय निलंगा यांना सादर करण्याचे आदेशित करूनही गटविकास अधिकारी किरण कोळपे हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता स्वतःच्या फायद्यासाठी अनाधिकृत बांधकाम धारकाशी संगणमत करून चिरीमिरी घेऊन वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या गटविकास अधिकारी किरण कोळपे यांच्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची व दंडात्मक कार्यवाही करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
31/01/2024 च्या पत्रानुसार गटविकास अधिकारी किरण कोळपे पंचायत समिती देवणी यांनी लेखी पत्र देऊन तक्रारदार यांना कळविले की आपण विभागीय आयुक्त कार्यालय येथे करत असलेले बेमुदत आमरण उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे वरिष्ठ कार्यालयाचे पत्र पंचायत समितीला प्राप्त झाले असून अनाधिकृत बांधकामावर योग्य ती कारवाई करणे बाबत कळविले आहे सदरील प्रकरणाची चौकशी करण्या करिता त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे पत्र देऊन सहा महिन्या पेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही एकंदरीत सदर प्रकरणात किरण कोळपे गटविकास अधिकारी व चौकशी समिती अधिकारी तथा विस्तार अधिकारी अशोक कट्टेवार व अन्य दोन चौकशी अधिकारी यांनी अनाधिकृत बांधकाम धारकाशी संगणमत करून चिरीमिरी घेऊन अद्याप जाणून-बुजून कार्यवाही करण्यास टाळाटाळ करून कर्तव्यात कसूर करून शासनाची व तक्रारदाराची फसवणूक करून भ्रष्टाचार करीत आहेत त्यामुळे या तिन्ही अधिकारी विरुद्ध कठोर शिस्तभंगाची व दंडात्मक कार्यवाही करून गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावे. अन्यथा दि.12/08/2024 रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषणास बसत असल्याचे मंत्रालयात दिलेल्या तक्रारीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी नमूद केले आहे.
*सर्वेनंबर मधील बांधकामाना परवानगी देण्याचे ग्रा.पं.ला अधिकार नाही*
वलांडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी अवैध बांधकाम धारकांना तीन नोटीस बजावल्या त्या तिसऱ्या नोटीस मध्ये असे उल्लेख आहे की सदरील बांधकाम नियमाप्रमाणे नसून, मालकी पेक्षा जास्त जागेत बांधकाम केल्याचे दिसून येत आहे, सदरील जागेतील बांधकाम हे सर्वे नंबर क्षेत्रात असल्यामुळे सदरील जागेबाबत प्रथम महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 52 (2) महसूल विभाग म्हणजेच उपविभागीय अधिकारी निलंगा व तहसीलदार देवणी यांची परवानगी घेतलेली नाही अकृषि लेआउट बांधकाम प्लॅन इत्यादी कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच केलेले बांधकाम अधिकृत नाही अशी नोटीस ग्रामपंचायत वलांडी यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.