गुरुवारी शेकडो शेतकरी आणि निराधारांचा मशाल मोर्चा...
..
शेतकरी नेते रविकांत तुपकरांची उपस्थिती
...
औसा :पीक विमा तात्काळ वाटप करावे सांगयों व. इंगयो निराधार योजनेतील मानधन तीन हजार रुपये करावे यासह विविध मागण्यासाठी गुरवार दि 11 रोजी निराधार संघर्ष समिती व शेकडो शेतकरी व निराधारांच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे येथील किल्ला मैदान ते तहसील कार्याल्यावर मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती शेतकरी नेते तथा निराधार संघर्ष समितीचे राजेंद्र मोरे व राजू कसबे यांनी दिली आहे या मोर्चास शेतकरी आणि निराधारांचा असंतोष सरकार दरबारी औशातून मशाल मोर्चा काढून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर उपस्थिती राहणार आहेत..
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आणि निराधार लाभार्थ्यांसाठी काही तरी भरीव तरतूद करेल अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
गेली पाच वर्ष शेतकरी आणि निराधारासह जनतेचे असंख्य प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई कार्यकर्त्याच्या जोरावर आम्ही लढतो आहोत मात्र सरकार आमचे आंदोलने चिरडून टाकून भांडवलदार आणि व्यापारी यांच्यासाठीच सत्ता वापरली पाहिजे या अविर्भावात वागत आहे. गुरुवारी औसा येथे गत वर्षीचा पीकविमा तात्काळ देण्यात यावा, निराधारांचे मानधन 3000 रुपये दरमहा करावे, सोयाबीनला 10000 रुपये भाव द्यावा या मागण्यासाठी मशाल मोर्चा काढून सरकार विरोधात जनता एल्गार पुकारणार आहे.
या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.