लातूर मधील दलित हत्याकांड प्रकरणी कॉंग्रेस चे नाना पटोले यांना भिम आर्मी चे निवेदन
लातूर प्रतिनिधी - लक्ष्मण कांबळे
लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी दलित युवक, विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गांधी चौक येथे सर्व आंबेडकरी संघटना पक्षांच्या वतीने तीन दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले या आंदोलनात सर्व प्रकरणांमध्ये 302 व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा सर्व प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी सर्व प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे वरील सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे लातूर जिल्ह्याला दलित अन्यायग्रस्त जिल्हा घोषित करावे वरील सर्व प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात यावे गांजूर प्रकरणातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांवरील 353 सारखे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे.
अशा मागणीचे निवेदन आज कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात लोकप्रतिनिधी म्हणून वरिल सर्व प्रकरणातील पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा टप्पा 15 ऑगस्ट रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी संघटना पक्षांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला
यावेळी भिम आर्मी चे माजी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे तालुका अध्यक्ष मारूती घनगावकर शहर उपाध्यक्ष परमेश्वर ताकपिरे शहर सचिव समाधान झोडपे अजय भांडेकर विशाल पैठणे आदी पदाधिकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.