मानवी हक्क अभियानाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शकील शेख यांची निवड
औसा
महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,शाहु,फुले,आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार, तळागाळातील लोकांसाठी सदैव तत्पर आणि सामाजिक बांधिलकीचे जतन करणाऱ्या मानवी हक्क अभियानाच्या लातूर कार्याध्यक्षपदी शकील शेख(अण्णा)यांची एकमताने निवड करण्यात आली.
आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी या ब्रिद्य वाक्याप्रमाणे कार्य व कर्मवीर एकनाथजी आवाड यांचे विचार आणि डॉ. मिलिंद आवाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अभियानात काम करण्याची संधी शकील शेख यांना देण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांनी दिले असून त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अनंत सांळुके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, सचिव मारुती गुंडाले आणि जिल्ह्यातील खालील तालुकाध्यक्ष यात शिवराज गुरळे,श्रीकांत सुर्यवंशी, संग्राम घोमाडे,आशाताई वाघमारे, गजानन गायकवाड, उध्दव दुळे,लक्ष्मण रंदवे,अर्जुन जाधव,हरीभाऊ राठोड,विलास भोसले,गोपाळ सांळुके,बालाजी पाटुळे,आदिंनी अभिनंदन केले आहे.मला जी संधी देण्यात आली. त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे नुतन जिल्हाकार्याध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.